ध्यास विश्वसार्ह बातमीचा

हन्नूर येथे २ एप्रिल रोजी भव्य हन्नूर केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

सालाबादाप्रमाणे यंदाही अक्कलकोट तालुक्यातील हन्नुर येथे बुधवार २ एप्रिल रोजी भव्य हन्नुर केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.या उपक्रमातून बळीराजाला अधिक
बळ मिळावे यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती युवा नेते सागर कल्याणशेट्टी यांनी दिली. आमदार सचिन कल्याणशेट्टी व ज्येष्ठ नेते सिद्धेश्वर कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे हे चौथे पर्व असून जास्तीत जास्त स्पर्धकांनी या शर्यतीत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

पहिले बक्षीस सागर कल्याणशेट्टी यांच्याकडून २ लाख ११ हजार रुपये, दुसरे बक्षीस देखील त्यांच्याकडूनच १ लाख ११ हजार रुपये, तिसरे बक्षीस शरणप्पा हेगडे व जगन्नाथ पाटील यांच्याकडून ५१ हजार,चौथे बक्षीस मेजर राजेंद्र भरमशेट्टी व बसवराज जकीकोरे यांच्याकडून ३५ हजार, पाचवे बक्षीस मेघराज दुलंगे यांच्याकडून ३० हजार,सहावे बक्षीस साई स्टील व हार्डवेअर आणि कल्याणी पाटील यांच्याकडून २५ हजार रुपयाचे जाहीर करण्यात आले आहे.या स्पर्धेमध्ये नाव नोंदणी व प्रवेश ऑनलाईन देखील करता येईल.१ एप्रिल रोजी ऑनलाईन लॉर्ड्स काढले जाणार आहेत. प्रवेश फी अकराशे रुपये असून या स्पर्धेत पंचाचा निर्णय अंतिम राहील. स्वतःचा छकडा असणे बंधनकारक आहे.सकाळी ८ वाजता या मैदानाला सुरुवात होईल. यासाठी गणेश हेगडे 97 67 57 67 39, सचिन जळकोटे 74 98 40 68 71, किरण हेगडे 95 18 91 52 95, नितीन बिराजदार 89 75 37 63 17 या क्रमांकावर ती संपर्क साधावे, असे आवाहन आयोजकाच्यावतीने करण्यात आले आहे. ही स्पर्धा हन्नुर केसरी मैदान चैतन्य नगर येथे आयोजित करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!