ध्यास विश्वसार्ह बातमीचा

इफ्तार पार्टीच्या निमित्ताने अक्कलकोट शहरात राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आणि मुस्लिम बांधवांचा मुख्य सण असलेल्या रमजाननिमित्त अक्कलकोट शहरात शनिवारी सायंकाळी मैनोद्दीन कोरबू ,अशपाक काझी, सरफराज शेख व मित्र परिवाराच्यावतीने रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.या इफ्तार पार्टीला ही शहरवासियांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. यावेळी सामाजिक बांधिलकी जपत गरीब कुटुंबातील महिला वर्गांना धान्य वाटप करून त्यांना मदतीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.

या कार्यक्रमात माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे,अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले,कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले,माजी सभापती प्रथमेश म्हेत्रे,जेष्ठ नेते अशपाक बळोरगी, दिलीप सिद्धे,प्रथमेश इंगळे,रईस टिनवाला, भाऊ कापसे,बाळासाहेब कुलकर्णी – बबलादकर यांनी उपस्थितांना रमजाननिमित्त शुभेच्छा दिल्या.हा सण मुस्लिम बांधवांचा असला तरी हिंदू बांधव या इफ्तार पार्टीचे निमित्ताने मोठ्या संख्येने सहभागी होतात.हे एक सामाजिक ऐक्याचे प्रतीक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा अक्कलकोट शहर आणि तालुक्यात सुरू आहे.ही बाब सामाजिक सलोख्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे,अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली.यावेळी अन्नछत्र मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे,सचिव शाम मोरे,लाला राठोड,माजी नगरसेवक सद्दाम शेरीकर,माजी उपसभापती सिद्धार्थ गायकवाड,मनोज निकम,प्रवीण घाटगे,
शकील शेख,अकिल बागवान,प्रशांत साठे,हुसेन मुजावर, सलीम यळसंगी, विलास राठोड,शबाब शेख,मुबारक कोरबू आदींसह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!