---Advertisement---

आता फक्त 899 रुपयांमध्ये करा विमानाने प्रवास ; SpiceJet कडून जबरदस्त ऑफर

On: January 13, 2021 6:20 PM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली । कोरोना साथीच्या आजारामुळे देशी आणि आंतरराष्ट्रीय प्रवाश्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. अशा परिस्थितीत प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी SpiceJet ने एक स्पेशल ‘Book Befikar Sale’ आणला आहे. या सेल अंतर्गत घरगुती प्रवासाचे भाडे 899 रुपयांपासून सुरू होत आहे. आजपासून (13 जानेवारी) पासून यासाठीचे तिकिट बुकिंग सुरू झाले आहे, जे 17 जानेवारी 2021 रोजी बंद होईल. या सेल अंतर्गत तिकिट बुकिंगसाठी 1 एप्रिल 2021 ते 30 सप्टेंबर 2021 दरम्यान प्रवास करता येईल.

या सुविधा उपलब्ध असतील

Book Befikar Sale: घरगुती प्रवासाचे भाडे 899 रुपयांपासून सुरू होते. याशिवाय कोणत्याही शुल्काशिवाय तिकिटांची तारीख बदलण्याची तसेच रद्द करण्याची सुविधादेखील देण्यात येत आहे. अधिकाधिक प्रवाश्यांना आकर्षित करण्याच्या प्रयत्नात कंपनीने या ऑफर अंतर्गत फ्री तिकीट व्हाउचर जाहीर केले आहे.

HM Whatsapp Group

कंपनीने म्हटले आहे की, या फ्लाइट व्हाउचरची किंमत तिकिटाच्या मूळ भाड्यांइतकीच असेल. जेव्हा जेव्हा ग्राहक या सेल ऑफर अंतर्गत तिकिट बुकिंग करतील तेव्हा त्याला प्रत्येक बुकिंगसाठी जास्तीत जास्त एक हजार रुपयांचे व्हाउचर मिळेल. हे व्हाउचर भविष्यात तिकिट बुकिंगसाठी देखील वापरता येईल.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!