---Advertisement---

मतदार यादीमध्ये विचित्र घोळ ; एकाच घराच्या पत्त्यावर तब्बल 102 मतदारांची नोंदणी

On: January 14, 2021 12:37 PM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली – मतदार यादीमध्ये गोंधळ असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत असते. मतदारयादीमधून अनेकांची नावे गायब असतात तर काही ठिकाणी अगदीच उलट चित्र पाहायला मिळते. मात्र, असाच एक घोळ समोर आला आहे. हिमाचल प्रदेशमधील ऊना जिल्ह्यातील हरोली विधानसभा मतदारसंघातील एकमेव नगरपंचायत असणाऱ्या टाहलीवालमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. काँग्रेसचे स्थानिक आमदार मुकेश अग्निहोत्री यांनी यासंदर्भात नाराजी व्यक्त करत मतदार यादीच्या विश्वासार्हतेसंदर्भात सवाल उपस्थित केला आहे.

 

आमदार मुकेश अग्निहोत्री यांनी आपल्या सोशल मीडियावरील अकाऊंटवरून पंचायतींच्या निवडणुकीसंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. तसेच काही फोटो शेअर करून निवडणुकींमध्ये काहीतरी घोळ असल्याचा आरोप देखील केला आहे. अग्निहोत्री यांनी फेसबुकवर मतदार यादीचा फोटो शेअर करत एकाच घराच्या पत्त्यावर तब्बल 102 मतदारांचं ओळखपत्र बनवण्यात आल्याचा आरोप केला आहे. टाहलीवाल येथील नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या या मतदार ओळखपत्रांमध्ये एकाच घराच्या पत्त्यावर दाखवण्यात आलेल्या मतदारांपैकी अनेकजण हे प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे.

याच कारणामुळे मतदारयादीमध्ये मोठा घोळ असल्याचा आरोप अग्निहोत्री यांनी केला आहे. यासंदर्भात स्थानिक प्रशासनाने कोणतीही प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाही. आपल्याला या गोंधळासंदर्भात काहीच कल्पना नसल्याचे हरोलीचे उपविभागीय दंडाधिकारी असणाऱ्या गौरव चौधरी यांनी म्हटले आहे. तसेच याबद्दल कोणी तक्रार केल्यास कारवाई केली जाईल, असेही चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!