---Advertisement---

अवघ्या 877 रुपयांत करा विमान प्रवास ; ‘इंडिगो’ ची ऑफर

On: January 15, 2021 11:53 AM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली । विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवांशासाठी ‘इंडिगो’ या विमान कंपनीने एक विशेष ऑफर जारी केली आहे.  इंडिगोने अवघ्या 877 रुपयांत विमानाने प्रवास करण्याची संधी देत ​​आहे. कंपनीने या ऑफरला बिग फॅट इंडिगो सेल असे नाव दिले आहे. याशिवाय एचएसबीसी किंवा इंडसइंड कार्डद्वारे तिकिट बुक केल्यास तुम्हाला अतिरिक्त फायदेही मिळतील.

बिग फॅट इंडिग सेलचे आयोजन 13 जानेवारी ते 17 जानेवारी दरम्यान करण्यात आले आहे. या कालावधीत, प्रवासी 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2021 दरम्यान प्रवास करू शकतील. सध्या इंडिगोची सेवा ही 63 डमेस्टिक डेस्टिनेशन आणि 24 इंटरनॅशनल डेस्टिनेशनवर उपलब्ध आहे. सामान्य परिस्थितीत, कंपनी दररोज सुमारे 1500 फ्लाइटस चालवते. त्याच वेळी, त्यांच्या ताफ्यात एकूण 284 विमानांचा समावेश आहे.

HSBC वर मिळवा खूप सवलत

तुम्हाला एचएसबीसी क्रेडिट कार्डवर 5 टक्के कॅशबॅक मिळेल, त्याची कमाल मर्यादा 750 रुपये असेल परंतु त्यासाठी किमान व्यवहार 3000 रुपये असावे लागेल. तरच आपण त्याचा लाभ घेऊ शकाल. हे व्यवहार इंडिगोच्या अधिकृत वेबसाइट किंवा त्यांच्या अ‍ॅपद्वारे केले पाहिजेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!