---Advertisement---

पॉर्न पाहणाऱे संकटात ; ‘या’ प्रसिद्ध पॉर्न वेबसाईटचा डेटा चोरीला

On: January 25, 2021 12:55 PM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली : लपून-छपून पॉर्न पाहणाऱ्यांची आता खैर नाही. एका प्रसिद्ध पॉर्न वेबसाइटचा डेटा लीक झाला आहे. या डेटात युजर्संचे नाव आणि ईमेल यासारखी खासगी माहितीचा समावेश आहे. रिपोर्ट नुसार हॅकर या माहितीचा गैरवापर करू शकणार असानू सायबर हल्ले किंवा युजरला ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी करू शकतात.

Cyber News ने दिलेल्या वृत्तानुसार, MyFreeCams नावाच्या एका पॉर्न वेबसाईटचा डेटा लीक झाला आहे. लीक डेटामध्ये जवळपास 20 लाख युजरची माहिती आहे. यामध्ये युजरचा ईमेलआडी, आयपी अॅड्रेस, त्यांनी केलेले सर्च, युजरनेम आणि पासवर्ड सारखी खासगी माहिती आहे. आता ही माहिती ब्लॅक मार्केटमध्ये विकली जात आहे.

यावर हे हॅकर माहितीच्या बदल्यात बिटकॉईनची मागणी करत आहेत. हा डेटाबेस युजरच्या एका प्रसिद्ध फोरमवर विकला जात आहे. 10000 युजरसाठी 1500 डॉलरचे बिटकॉईन मागितले जात आहेत. त्यांचा असा दावा आहे की या 10 हजार युजरचा डेटा खरेदी करून कमीत कमी 10 हजार डॉलर कमावले जाऊ शकतात.

डेटा लीक झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर पॉर्न वेबसाईटने सांगितले की, युजरना सूचना देण्यात आली असून त्यांचे पासवर्डही रिसेट केले आहेत. ही वेबसाईट पॉप्युलर अॅडल्ट वेबसाईटच्या यादीत २७ व्या नंबरवर आहे. या वेबसाईटचे महिना 7 कोटी व्हिजिटर आहेत. महत्वाचे म्हणजे, हॅकर कोणत्याही प्रकारे या माहितीचा वापर करू शकतात. युजरला ब्लॅकमेल केले जाणारे ईमेल येऊ शकतात. ही माहिती मित्र, कुटुंबीय, समाजात व्हायरल केली जाण्याची शक्यता आहे. अशी धमकी ते देऊ शकतात. तसेच ईमेल आयडी फिशिंग किंवा स्पॅमसाठीही वापरला जाऊ शकतो.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!