---Advertisement---

सखी ग्रुपचा यमगरवाडीच्या विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात!

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, तालुका प्रतिनिधी : सखी ग्रुप अक्कलकोटच्या वतीने यमगरवाडी येथील एकलव्य विद्या संकुलास कॅनन कंपनीचा प्रिंटर भेट देण्यात आला. शैक्षणिक कामकाजात सुविधा उपलब्ध व्हावी आणि विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

सखी महिला मंडळाच्या माध्यमातून महिलांसाठी विविध प्रशिक्षण उपक्रम, भटके-विमुक्त वस्तीवरील सेवाकार्य, आरोग्य शिबिरे, मुलींच्या शिक्षणासाठी मदत तसेच किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शन असे सामाजिक उपक्रम सातत्याने राबविले जातात. याच सामाजिक बांधिलकीतून ग्रुपच्या सदस्यांनी यमगरवाडी येथील एकलव्य विद्या संकुलास प्रिंटर भेट दिला.

यावेळी सखी ग्रुपच्या ज्येष्ठ शिक्षिका पसारे मॅडम, सोनल जाजू, अनिता पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा साखरे, उषा छत्रे, लक्ष्मी अचलेर, मिलन तोरजाकर, माधवी साळे, अशा भांगे, रोहिणी फुलारी, शितल झिरोळे, अश्विनी बोराळकर, रत्नमाला मचाले आणि श्रद्धा मंगरुळे उपस्थित होत्या.

यावेळी संस्थेच्या वतीने पसारे मॅडम आणि सोनल जाजू यांचे शाल देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमास संकुलाचे मुख्याध्यापक विठ्ठल म्हेत्रे, अधीक्षक फुलाजी ताटीकुंडलवार, दत्ता भोजने, संगीता पाचंगे आणि कोंडीबा देवकर उपस्थित होते.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!