---Advertisement---

इंडिया आघाडीच्या बैठकीकडे पवारांच्या खासदारांची पाठ !

Follow Us:
---Advertisement---

मुंबई वृत्तसंस्था – देशाच्या राजकारणात सध्या परिसीमन अर्थात मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून जोरदार चर्चा सुरू आहे. मोदी सरकारने हे विधेयक संसदेत मंजूर करण्यासाठी तयारी सुरू केली असताना विरोधकांची इंडिया आघाडीही सक्रिय झाली आहे. मात्र, या महत्त्वाच्या मुद्द्यावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. त्यातच आता पवारांच्या खासदारांनी मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे.

परिसीमन विधेयकावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वेगवेगळे सूर उमटताना दिसत आहेत. पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या विधेयकाला पक्षाचा पाठिंबा असल्याचे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्यांच्या या भूमिकेमुळे इंडिया आघाडीतही संभ्रम निर्माण झाला. मात्र, खासदार सुप्रिया सुळे यांनी विधेयकाचा मसुदा वाचल्याशिवाय पक्ष कोणताही निर्णय घेणार नसल्याचे स्पष्ट करत सावध भूमिका घेतली.

दरम्यान, परिसीमन विधेयकावर चर्चा करण्यासाठी इंडिया आघाडीने दिल्लीत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. मात्र, या बैठकीला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही खासदार उपस्थित राहणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे इंडिया आघाडीला मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विशेष म्हणजे, शरद पवार सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. अशा परिस्थितीत पक्षाच्या खासदारांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यापूर्वीच सुप्रिया सुळे या बैठकीला जाणार नसल्याचे स्पष्ट झाले होते. आता पक्षाचा एकही खासदार बैठकीला उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर आल्याने चर्चेला आणखी हवा मिळाली आहे.

दुसरीकडे, काँग्रेसकडून पवारांच्या पक्षाच्या भूमिकेवर टीका करण्यात आली आहे. संजय राऊत यांनीही यापूर्वी या विषयावर भाष्य केले होते. त्यामुळे परिसीमन विधेयकावर शरद पवारांची राष्ट्रवादी नेमकी कोणती भूमिका घेणार आणि इंडिया आघाडीतील या घडामोडींचा पुढील राजकारणावर काय परिणाम होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!