---Advertisement---

धक्कादायक : भाजप नेत्याच्या घरावर दहशत्वाद्यांचा हल्ला

Follow Us:
---Advertisement---

 

जम्मू-काश्मीर : श्रीनगरमधील नौगाम परिसरात भारतीय जनता पक्षाच्या नेत्याच्या घरावर दहशहतवाद्यांनी हल्ला केला असून त्यामध्ये एका पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. हल्ल्यावेळी भाजप नेते अन्वर खान घरात नव्हते.

दहशतवाद्यांनी हल्ला करुन पळुन जाताना सुरक्षा रक्षकाची रायफल पळवून नेली आहे. यापूर्वी सोमवारी सोपोरामध्ये बीडीसी चेअरपर्सन फरीदा खान यांच्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. त्या हल्ल्यात पीएसओसह दोन व्यक्तींचा मृत्यू झाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार नौगामच्या भाजपचे नेते अन्वर खान यांच्या घरावर दहशहतवाद्यांनी गोळीबार करत घरात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. या गोळीबारात पोलिस कर्मचारी रमीज राजा गंभीर जखमी झाले होते त्यांना रुग्णालयात हलविण्यात आलं. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!