---Advertisement---

सांगवी बुद्रुक येथे शिवराज्याभिषेक दिनी छत्रपती शिवरायांना अभिवादन

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.६ : अक्कलकोट तालुक्यातील सांगवी (बु) येथे शिवस्वराज्य
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या दिनाच्या निमित्ताने शिवध्वजारोहण कार्यक्रम करून छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात आले.

राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत श्रेया सुरडी,श्रुती सुरडी , स्नेहा भोसले यांच्या मंत्रमुग्ध स्वरात घेऊन हा दिन साजरा करण्यात आला. प्रारंभी श्रुती सुरडी यांनी गावकऱ्यांना शिवस्वराज्य दिनाविषयी माहिती सांगून गावकऱ्यांना प्रबोधन केले.

याप्रसंगी सरपंच वर्षा भोसले, उपसरपंच लक्ष्मण डांगे, पोलीस पाटील शुभांगी बाबर ,ग्रामसेवक पोमाजी, माजी सरपंच अबूबकर शेख, मेजर बाळासाहेब भोसले, संजयकुमार भोसले, विद्वान रेड्डी, दिलीप भोसले, प्रदीप सलबत्ते, जनोद्दिन पठाण, यातीराज भोसले, इरफान शेख, सुभाष देवकर, राजू सलबत्ते, सुरेश भोसले, दादा भोसले, रोहित घाटगे, संभाजी खरात निखिल निकम ,रावसाहेब मोरे, आदिल शेख, अबूबकर शेख, मुन्ना शेख, रवी राठोड, ग्रा. प. कर्मचारी वाशीम शेख, तोईद मुल्ला, राजू खरात अंगणवाडी सेविका,आशा वर्कर,सर्व गावातील प्रतिष्ठित व युवा वर्ग उपस्थित होते. उपस्थितांचे आभार सरपंच भोसले यांनी मानले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!