---Advertisement---

तांत्रिक बिघाडीमुळे MiG 29K विमान गोव्याच्या किनार्‍यावर कोसळले

Follow Us:
---Advertisement---

 

गोवा : गोव्याच्या किनार्‍यावर MiG 29K लढाऊ विमान तळावर परतत असताना तांत्रिक बिघाड झाल्यामुळे समुद्रात कोसळले. सुदैवाने यात पायलटचा जीव बचावला आहे. पायलटने वेळेत इजेक्ट केल्याने त्याचा जीव वाचला आहे. या पायलटला जलद शोध आणि बचाव पथकाने शोधून काढत त्याला रुग्णालयात दाखल केले आहे.

पायलटची प्रकृती स्थिर असल्याची माहिती भारतीय नौदलाने दिली आहे. सदर दुर्घटनेची चौकशी करण्यात येत असून चौकशी नंतर दुर्घटनेमागचे नेमके कारण कळू शकेल असे नौदलाने सांगितले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!