---Advertisement---

महारावांच्या अटकेसाठी अक्कलकोटमधील व्यापारी महासंघ आक्रमक !

By team
On: September 14, 2024 10:11 AM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

लाखो स्वामी भक्तांच्या भावना दुखावून वातावरण दूषित केल्याप्रकरणी ज्ञानेश महाराव यांना त्वरित अटक करण्याची मागणी अक्कलकोट व्यापारी महासंघाच्यावतीने शुक्रवारी उत्तर पोलीस ठाण्याकडे आली.याप्रसंगी सर्व व्यापाऱ्यांच्या वतीने निषेध देखील नोंदवण्यात आला. याप्रकरणी पोलीस स्टेशन व तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांविषयी अशा प्रकारचे अपशब्द वापरून संपूर्ण जगातील भक्तांच्या भावना मुद्दामून दुखावण्याचा प्रयत्न महाराव यांनी केला आहे.तो कधीही न सहन करण्यासारखा आहे.केवळ गुन्हा दाखल करून चालणार नाही तर त्यांना अटक करून योग्य ती शिक्षा झाली पाहिजे,अशी आमची भूमिका असल्याचे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मल्लिनाथ साखरे यांनी सांगितले.रोज काही ना काही बोलून काही लोक समाजात वादविवाद निर्माण
करत असतात.त्यांना वेळीच आवर घालण्याची गरज आहे. त्यासाठी पोलीस प्रशासनाने सुद्धा तात्काळ कारवाई करून हे वातावरण निवळण्याची गरज आहे, अशी भूमिका संतप्त व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. यावेळी उपाध्यक्ष प्रसन्न हत्ते, सचिव नितीन पाटील, गजानन पाटील, दिनेश पटेल ,संतोष घिवारे, रामेश्वर पाटील ,स्वामीनाथ अलदी,दत्ता कटारे,राजेंद्र भुजंगे, दयानंद बिडवे ,प्रशांत केसकर, वीरेंद्र पाटील ,राजशेखर सोड्डे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!