---Advertisement---

अक्कलकोटमध्ये कोरोनामुळे एक दिवसाड पती-पत्नीचा मृत्यू, गाढवे कुटुंबावर शोककळा

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.२ : अक्कलकोट येथील आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे स्वीय सहाय्यक धनंजय गाढवे यांच्या आई – वडिलांचा मृत्यू कोरोनामुळे झाला.कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.त्यामुळे तालुक्यातुन हळहळ व्यक्त होत आहे. अक्कलकोट येथील पुकाळे प्लॉटमध्ये ते राहत होते.वीस दिवसांपूर्वी मुलगा धनंजय पॉझिटिव्ह निघाला होता.ते बरे झाले.त्यानंतर आई-वडील दोघांनाही कोरोनाची लागण झाली होती.त्या दोघांवरही सोलापूरात उपचार सुरू होते.त्यांना
धनंजय एकुलता एक मुलगा आहे.परवा त्यांच्या आईचे निधन झाले आणि आज वडिलांचे निधन झाले.यात सुरेखा गाढवे ( वय – ६७) व सिद्रामप्पा गाढवे ( वय – ७५) या दोघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. मुलगा पॉझिटिव झाल्यानंतर या दोघांनाही लागण झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पहिल्यांदा आईला सोलापुरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले त्यात त्यांचे निधन झाले त्यानंतर वडीलालाही त्रास होऊ लागल्याने त्यांनाही दाखल करण्यात आले होते त्यात आज त्यांचा मृत्यू झाला.आई-वडील या दोघांचे छत्र हरपल्याने गाढवे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.ही घटना खूप दुर्दैवी असून गाढवे यांच्या कुटुंबात कुटुंबाच्या दुःखात मी सहभागी आहे.यातून तालुक्यातील लोकांनी देखील कोरोनाचे गांभीर्य ओळखावे,अख्खे कुटुंब उद्धवस्त होत आहेत.अजिबात विनाकारण घराबाहेर पडू नये, मास्क आणि सोशल डिस्टन्सचा वापर करावा, असे आवाहन आमदार
सचिन कल्याणशेट्टी यांनी केले आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!