---Advertisement---

बादोले गावच्या सरपंचपदी पार्वती धायगोडे तर उपसरपंचपदी सिध्दाराम बिराजदार यांची बिनविरोध निवड

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट (प्रतिनिधी) :- बादोले बु. ग्रामपंचायतीच्या नुतन सरपंचपदी पार्वती दिगंबर धायगोडे तर उपसरपंचपदी सिध्दाराम पंचाक्षरी बिराजदार यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा अध्यासी अधिकारी सुभाष धर्मसाले यांनी केली. यावेळी सहाय्यक अधिकारी म्हणून तलाठी तानाजी थोरात, ग्रामसेवक व्हि. के. कुंभार यांनी कामकाज पाहिले.

सदर निवड जाहीर झाल्यानंतर नुतन सरपंच व उपसरपंच यांचा फेटा, शाल, श्रीफळ, पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सरपंच बाजीराव खरात, गौरीशंकर गायकवाड, मल्हारी देवकर, बसवणप्पा बिराजदार, राजू सलगरे,संजय धायगोडे, मल्लिनाथ बगले, सैदू शेख, नंदकुमार स्वामी, दत्तात्रय माडकर,मशीद शेख, धनराज बिराजदार,आदी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!