---Advertisement---

मोठी बातमी : कॉंग्रेसची पहिली यादी जाहीर ; अक्कलकोट मधून सिद्धाराम म्हेत्रे मैदानात !

By team
On: October 25, 2024 8:59 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात महायुतीनंतर महाविकास आघाडीतील ठाकरे व पवार गटाची कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर आता कॉंग्रेस यादी जाहीर झाली आहे. काँग्रेसच्या उमेदवार यादीबाबत गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता होती. विशेष म्हणजे महायुतीच्या तीनही घटक पक्षांनी उमेदवारांची यादी जाहीर केली, महाविकास आघाडीतून ठाकरे गट आणि शरद पवार गटाकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. यानंतर काँग्रेस पक्षाकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

या यादीत एकूण 48 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसच्या या यादीत काही ठिकाणी विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर काही ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा सुटला नव्हता. त्यामुळे काँग्रेसची उमेदवार यादी येण्यास विलंब झाला. अजूनही अनेक जागांवरचे उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीत.

 

 

अखेर महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चेनंतर काँग्रेसकडून देखील उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीसाठी एकूण 48 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये अक्कलकुवातून के. सी. पाडवी, शहादा येथून राजेंद्र गावित, धुळे ग्रामीणमधून कुणाल पाटील, नंदुरबारमधून किरण तडवी, रावेरमधून धनंजय चौधरी, मलकापूरमधून राजेश एकडे, नवापूर येथून शिरीशकुमार नाईक, चिखलीतून राहुल बोंद्रे, अक्कलकोट मधून सिद्धाराम म्हेत्रे यांच्या नावांचा समावेश आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!