सातारा: सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला. या धक्कादायक पराभवामुळे शिंदे समर्थक प्रचंड संतापले आहेत. कार्यकर्त्यांच्या या कृत्यानंतर आमदार शहिकांत शिंदे यांनी माफी मागितली आहे.
राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वामुळेच शिंदे यांचा पराभव झाल्याचा आरोप करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी थेट पक्ष कार्यालयावरच हल्ला चढवला आहे. शिंदे समर्थकांनी पक्ष कार्यालयावर दगडफेक करत राग व्यक्त केला असून त्यामुळे परिसरातील वातावरण तापलं आहे.






