अक्कलकोटची चौडेश्वरी देवी यात्रा रद्द

अक्कलकोट,दि.४ – येथील कुंभार गल्लीतील श्री चौडेश्वरी देवी चँरिटेबल ट्रष्ट च्यावतीने सालाबादाप्रमाणे होणारी ग्रामदैवत श्री चौडेश्वरी देवीची यात्रा यंदाच्या वर्षी कोरोना महामारीमुळे रद्द करण्यात आली आहे. यंदाची श्री चौडेश्वरी देवीची यात्रा दि. ८ जून चतुर्दशी पासून, दि. ९ जून अमावस्या व दि. १० जून पर्यंत असे तीन दिवस साजरा होणार होती. परंतु  देशभरात कोरोना रोगाचा … Read more

पंढरपूरमध्ये नविन जागेत महाद्वार पोस्ट ऑफिस सुरु,ग्राहक पंचायतीच्या प्रयत्नांना यश

पंढरपूर- शहरातील महाद्वार पोस्ट ऑफिस नुकतेच ग्रामसेवक पतसंस्था,उमदेगल्ली या नविन जागेत स्थलांतरीत झाले आहे. तेथील कामकाजाचा शुभारंभ अ.भा.ग्राहक पंचायतीचे जिल्हा संघटक व पोस्ट फोरम सदस्य शशिकांत हरिदास व जिल्हा कोषाध्यक्ष सुहास निकते यांचे प्रमुख उपस्थितीत नुकताच संपन्न झाला. मागील दिड वर्षापासुन महाद्वार पोस्टाची जुनी इमारत करार संपल्याने सोडावी लागणार असल्याने प्रदक्षणा मार्गावरील हे पोस्ट ऑफिस … Read more

कोरोना संकटात १ हजार कुटुंबासाठी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आले धावून !

अक्कलकोट, दि.२६ : कोरोनाच्या लाटेमुळे लोकांचे प्राण वाचविण्यासाठी शासनास कडक लॉकडाऊन करावे लागत आहे. त्यामुळे छोटे छोटे व्यवसाय करून जगणाऱ्या कित्येक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर अक्कलकोट शहरातील गरजू लोकांसाठी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातर्फे गेल्या ३९ दिवसांपासून रोज अन्नदान करण्यात येत आहे.तसेच अक्कलकोट कोविड केअर सेंटर येथे गेल्या २६ दिवसांपासून रुग्णांना सकाळचा … Read more

पुण्यतिथीचे कार्यक्रम रद्द करून गरिबांना केले अन्नदान, अक्कलकोटच्या शरण मठाचा उपक्रम

अक्कलकोट, दि.२३ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट संस्थानचे राजगुरु श्री रेवणसिद्ध शिवशरण महास्वामीजींच्या ७१ व्या पुण्यतीथी निमित्त होणारे सर्व कार्यक्रम रद्द करून गरिबांना महाप्रसाद वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.या कामासाठी रॉबिन हूड आर्मीचे मोठे सहकार्य मिळाले.दरवर्षी शरण मठ अक्कलकोट येथे महास्वामींच्या पुण्य तिथीला भव्य कार्यक्रम होत असतात.परंतु सध्या निर्बंध कडक असल्याने सर्व कार्यक्रम रद्द करण्यात … Read more

श्री सदगुरु रेवणसिद्ध शिवशरण महास्वाजींचा पुण्यतिथी कार्यक्रम रद्द

अक्कलकोट, दि.१८ : महाराष्ट्रासह सोलापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात कडक लॉकडाउन करण्यात आले आहे.शनिवार दि २२ मे रोजी होणारे अक्कलकोट येथील श्री सदगुरु रेवणसिद्ध शिवशरण महास्वाजींचा ७१ वा पुण्यतिथी महोत्सव कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. कोरोना संसर्गजन्य रोगामुळे प्रशासनाने सर्व धार्मिक, सामाजिक कार्यक्रमावर घातलेल्या निर्बंधामुळे पुण्यतिथी महोत्सवात होणारा प्रवचन, … Read more

महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त दुधनीत विविध सामाजिक संघटनातर्फे अभिवादन

गुरुशांत माशाळ, दुधनी दि.१४: दुधनी येथील शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालय आणि इतर सामाजिक संघटनांच्यावतीने आद्य समाज सुधारक, महानसंत, युगपुरुष महात्मा बसवेश्वर यांच्या ८९०वी जयंती यंदाच्या वर्षी साधेपणाने साजरी करण्यात आली.महात्मा बसवेश्वर हे क्रांतिकारी संत होते. दुधनीत दर वर्षी अक्षय तृतीय आणि महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यानिमित्ताने बैल जोड्यांना पिवळ्या रंगाने रंगवून, … Read more

महात्मा बसवेश्‍वर जयंती शासकीय कार्यालयात साजर करण्याचे आदेश

सोलापूर : शासकीय आणि निमशासकीय कार्यालयात महात्मा बसवेश्‍वर महाराजांची जयंती साजरी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले आहेत. याबाबत अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकार्‍यांना ईमेल पाठवून याचे स्मरण केले होते.समितीचे महासचिव विजयकुमार हत्तुरे यांनी स्मरण पत्रात म्हटले होते की, सध्या कोरानाचा काळ असल्यामुळे अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीने बसवेश्‍वर जयंती ऑनलाईन साजरी … Read more

लोकमंगल बँकेच्या ऑनलाईन व्याख्यानमालेला उस्फुर्त प्रतिसाद; साडेसात हजार जणांनी नोंदवला सहभाग

सोलापूर (प्रतिनिधी) : लोकमंगल सहकारी बँकेच्या 23 व्या वर्धापन दिनानिमित्त बँकेचे अध्यक्ष, आ. सुभाष देशमुख यांच्या संकल्पनेनुसार ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. चार दिवस चाललेल्या या व्याखानमालेत सुमारे साडेसात हजार जणांनी सहभाग नोंदवाला होता. सध्या कोरोनाचा काळ असल्यामुळे बँकेचा 23 वा वर्धापन दिन साधेपणाने साजरा करण्यात आला. यंदा प्रथमच बँकेच्यावतीने एक आगळावेगळा उपक्रम म्हणून … Read more

रमजान ईदमध्ये ग्रामीण भागासाठी लॉकडाऊनमध्ये शिथिलता नाही, अक्कलकोट येथे प्रशासनाच्या बैठकीत निर्णय

अक्कलकोट : रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर खास बाब म्हणून लॉकडाऊन शिथिल करता येणार नाही मात्र किराणा, फळे, दूध घरपोच पोचवण्यासाठी सहकार्य करू, असे स्पष्ट प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड यांनी केले. या विशेष बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रांत अधिकारी दीपक शिंदे होते. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन मध्ये शिथिलता मिळावी यासाठी नगरपरिषद विरोधी पक्षनेते अशपाक बळोरगी … Read more

दुधनीत श्रीराम नवमी साधेपणाने साजरी

दुधनी दि. २१: श्री राम सेना संघटनेच्यावतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार मास्क, सामाजिक अंतर ठेवून साधेपणाने श्रीराम नवमी साजरी करण्यात आले. यावेळी प्रभु श्री राम यांची मूर्तीचे पूजन संघटनेचे सदस्य गुरुषांत गुळगोंडा यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनतर उपस्थित राम भक्तांना प्रसाद वाटप करण्यात आले. यावेळी बसवराज हौदे, बसवराज गुरुभेट्टी, कुमार मंगळुरे, महेश धल्लु, … Read more

Don`t copy text!