मागडी तालुक्यातील कंचूगल बंडेमठाच्या पीठाधीशांनी केली आत्महत्या

रामनगर : तीन महिन्यांपूर्वी कडले मठाच्या स्वामींनीसुद्धा गळफास घेत आत्महत्या केली होती ही घटना अजून ताजी असताना रामनगर जिल्ह्यातील मागडी तालुक्यातील कंचूगल बंडेमठाच्या पीठाधीशांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्या केलेल्या स्वामीजी यांचे नाव बसवलिंग स्वामीजी असं आहे. दिवाळीच्या दिवशी स्वामींच्या आत्महत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे. बसवलिंग स्वामी यांनी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्ये … Read more

मुलीला आयटम म्हणणं लैंगिक शोषणा पेक्षा कमी नाही ! पोक्सो न्यायालयाने ठोठावलं एका तरुणाला दीड वर्षांची शिक्षा

मुंबई : एखाद्या मुलीला आयटम असं म्हणून बोलवणं एखाद्या लैंगिक शोषणाहून कमी नाही, असं म्हणत पोक्सो न्यायालयाने एका आरोपीला दीड वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. एका १६ वर्षांच्या मुलीवर अश्लील टिप्पणी करण्याच्या आरोपाखाली ही शिक्षा ठोठावण्यात आली. ही घटना २०१५ मधील आहे. पीडिता शाळेतून घरी जात होती. तेव्हा वाटेत या तरुणाने तिचे केस ओढून तिला आयटम … Read more

महाराष्ट्रात एटीएसचे पुन्हा धाडसत्र, पनवेलमधून पीएफआयच्या ४ कार्यकर्त्यांना अटक

मुंबई : महाराष्ट्र एटीएसने पनवेलमधून पीएफआयच्या ४ कार्यकर्त्यांना अटक केली आहे. यात पीएफआयच्या सचिवाचाही समावेश आहे. पनवेलमध्ये रात्री उशिरा कारवाई करत एटीएस पथकाने चौघांना ताब्यात घेतले आहे. दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवून प्रशिक्षण दिल्याचा आरोप पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर ठेवत तपास यंत्रणांनी गेल्या काही दिवसांपूर्वी देशातील अनेक शहरांमध्ये छापेमारी करत पीएफआयच्या कार्यकर्त्यांना अटक केली … Read more

मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाने २३ व्या मजल्यावरुन उडी मारुन केली आत्महत्या

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाने आत्महत्या २३ व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पारस पोरवाल असे आत्महत्या केलेल्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. पारास पोरवाल हे दक्षिण मुंबईतील मोठे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलिस घटनास्थळी पोहचले असून घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. … Read more

अकलूज येथे बनावट देशी दारू कारखान्यावर धाड, गोवादारू सह साडेअकरा लाखाचा मुद्देमाल हस्तगत; राज्य उत्पादन शुल्क माळशिरस विभागाची कारवाई

अकलूज : राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक संदीप कदम यांनी त्यांचे पथकासह अकलूज शहरात एका गोडाऊनमध्ये छापा टाकून बनावट देशी दारू तयार करणारा कारखाना उघडकीस आणला असून त्या ठिकाणाहून बनावट देशी दारू, बुचे, गोव्याची दारू ,वाहन इत्यादी. सह ११ लाख ५८ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात केला आहे. सविस्तर वृत्त असे की, राज्य उत्पादन शुल्क माळशिरस … Read more

पोलीस ठाण्यातील ॲट्रॉसिटी प्रकरणांचा निपटारा करा, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना; जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती बैठक

सोलापूर,दि.12 : अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) ॲट्रॉसिटीबाबत अधिनियम 1989अंतर्गत पिडीतांना न्याय मिळण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. पिडीतांना अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी शहर आणि ग्रामीण पोलीस विभागाकडे प्रलंबित ॲट्रॉसिटी प्रकरणांचा निपटारा वेळेत करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या. जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकीत श्री. शंभरकर बोलत होते. यावेळी समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त कैलास … Read more

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी, बिहारमधून एकाला घेतले ताब्यात

मुंबई : रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांना पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आहे. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल येथे फोन करून ही धमकी देण्यात आली आहे. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलच्या नंबरवर एका अनोळखी नंबरवरून धमकी देण्यात आली असून मुकेश अंबानी, नीता अंबानी यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. तसंच रिलायन्स एचएन हॉस्पिटल … Read more

PFI संघटनेवर केंद्राची मोठी कारवाई, दहशतवादी कारवायांमध्ये गुंतल्याचा ठपका..

दिल्ली : PFI अर्थार्थ पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर केंद्र सरकारने मोठी कारवाई केली आहे. PFIवर पाच वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतली आहे. या संदर्भात तपास यंत्रणांनी गृहमंत्रालयाकडे शिफारस केली होती. पीएफआयशिवाय आणखी काही संघटनांवरही बंदीची कारवाई करण्यात आली आहे. तपास यंत्रणांच्या शिफारसीनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने पाच वर्षांच्या बंदीचा निर्णय घेतला आहे.   … Read more

महाराष्ट्र एटीएस आणि एनआयए पुन्हा ऍक्शन मोडवर, पीएफआयविरोधात पुन्हा एकदा कारवाई

दिल्ली : एनआयए आणि महाराष्ट्र एटीएस पुन्हा ऍक्शन मोडवर येत पीएफआय विरोधात पुन्हा एकदा कारवाई केली आहे. दरम्यान पुन्हा एकदा राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने मध्यरात्री मोठी कारवाई केली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने स्थानिक तपास यंत्रणांसह पुन्हा छापेमारी केली. तपास यंत्रणांनी आसाममधून ७ जणांना आणि कर्नाटकमधून १० जणांना अटक केली आहे. यामध्ये पीएफआय … Read more

धक्कादायक ! पोलीस अधिकारी असल्याचे सांगून वृद्धाची लाखाची रोकड लंपास, भरदिवसा शिवाजी महाराज चौकातील घटना

सोलापूर, दि. २४- येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एका इसमाने पोलीस अधिकारी असल्याचे सांगून भरदिवसा ज्येष्ठ नागरिकाची एक लाखाची रोकड लंपास केली. याबाबत शिवबसप्पा मलकप्पा विजापुरे (वय ८२, रा. कुरनूर, ता. अक्कलकोट) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात इसमाच्या विरोधात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजापुरे हे तारण ठेवलेले सोने सोडविण्याकरता एक … Read more