सोन्याने गाठला उच्चांक! मकर संक्रांतीआधी दर दीड लाखांच्या उंबरठ्यावर? चांदीही महागली

मुंबई वृत्तसंस्था : गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत असून, सणासुदीच्या काळात ही दरवाढ सर्वसामान्यांच्या चिंतेत भर घालणारी ठरत आहे. वाढत्या भावांमुळे आता सोनं मकर संक्रांतीपूर्वीच दीड लाखांच्या जवळ पोहोचणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शनिवारी, 10 जानेवारी रोजी सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली. 10 जानेवारी रोजी 24 … Read more

पहिली वंदे भारत स्लीपरचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार उदघाटन ; 17 जानेवारीपासून धावणार

नवी दिल्ली वृत्तसंस्था : भारतीय रेल्वेच्या इतिहासात एक नवा अध्याय जोडला जाणार असून कोलकाता ते गुवाहाटी दरम्यान पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन 17 जानेवारीपासून धावणार असल्याची घोषणा केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगालमधील मालदा टाऊन येथे या ट्रेनचे उद्घाटन करण्यात येणार आहे. ही अत्याधुनिक स्लीपर ट्रेन … Read more

लाडकी बहीण योजनेला मोठा धक्का; केवायसीनंतरही हजारो पात्र महिलांचे अनुदान बंद

राज्यातील अडीच लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना महिला वर्गात मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय ठरली आहे. दरमहा दीड हजार रुपयांच्या आर्थिक मदतीमुळे या योजनेचा थेट फायदा लाखो महिलांना होत असून, विधानसभा निवडणुकीतही या योजनेचा महायुतीला मोठा राजकीय लाभ झाल्याचे चित्र दिसून आले. मात्र आता याच योजनेबाबत एक धक्कादायक वास्तव … Read more

शेअर बाजार कोसळला, तेल कंपन्यांचे शेअर धडाधड पडले !

मुंबई वृत्तसंस्था : डोनाल्ड ट्रम्प यांनी 500 टक्के टॅरिफबाबत केलेल्या विधानानंतर भारतात मोठी खळबळ उडाली असून त्याचे तीव्र पडसाद थेट भारतीय शेअर बाजारात उमटले आहेत. या घोषणेनंतर बाजारात घबराट पसरली आणि सलग चौथ्या दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण नोंदवली गेली. विशेषतः तेल कंपन्यांचे शेअर मोठ्या प्रमाणात घसरल्याने गुंतवणूकदारांची चिंता अधिकच वाढली आहे. गुरुवारी सेन्सेक्स जवळपास … Read more

फुग्यात पाचपट हवा भरल्यासारखी मुंबई! – महेश मांजरेकर

मुंबई वृत्तसंस्था : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या ठाकरे बंधूंच्या बहुचर्चित मुलाखतीचा पहिला भाग अखेर प्रदर्शित झाला असून, या मुलाखतीत मुंबईच्या विकासावर आणि सध्याच्या दुरवस्थेवर जोरदार चर्चा रंगली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत आणि ज्येष्ठ दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना एकत्र बसवून विविध विषयांवर स्पष्ट भूमिका मांडायला लावली. मुंबई, राजकारण, … Read more

लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही ; रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यावर रितेश देशमुखांचे ठाम प्रत्युत्तर

मुंबई वृत्तसंस्था : महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातूरमधून पुसल्या जातील, असे वादग्रस्त वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या विधानामुळे लातूरसह संपूर्ण मराठवाड्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, काँग्रेस कार्यकर्ते आणि विलासराव देशमुखांवर प्रेम करणाऱ्या नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या पार्श्वभूमीवर विलासराव देशमुख यांचे … Read more

सोनं–चांदीचे दर उसळले! सोनं 1.39 लाखांवर, चांदी 2.47 लाखांवर

मुंबई वृत्तसंस्था : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच सोने आणि चांदीच्या दरांनी गुंतवणूकदारांसह सामान्य ग्राहकांनाही धक्का दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चढ-उतारानंतर आज, 5 जानेवारी रोजी सोन्या-चांदीच्या भावात अचानक मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. यामुळे सराफा बाजारात एकच खळबळ उडाली आहे. सुनर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावच्या सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात तब्बल 1,600 रुपयांची, तर … Read more

आजपासून आधार लिंक नसलेल्यांना IRCTC वर तिकीट बुकिंगला मर्यादा

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आजपासून, ५ जानेवारीपासून आधारशी लिंक नसलेल्या IRCTC वापरकर्त्यांना सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत ऑनलाइन आरक्षित रेल्वे तिकीट बुक करता येणार नाही. हा नियम आरक्षित तिकीट बुकिंग सुरू होण्याच्या पहिल्या दिवशीच लागू राहणार असून, आरक्षित तिकिटांची बुकिंग ट्रेन सुटण्याच्या तारखेच्या ६० दिवस आधी सुरू होते. रेल्वे प्रशासनाने हा नियम तीन … Read more

न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर; शुबमन गिलकडे नेतृत्व

मुंबई वृत्तसंस्था : टीम इंडियासाठी 2026 वर्षाची सुरुवात न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेने होणार असून, या मालिकेआधीच बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. 11 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करताना निवड समितीने कर्णधार बदल केला आहे. शुबमन गिलकडे संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं असून, श्रेयस अय्यरची उपकर्णधारपदी पुनरागमन झालं आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत दुखापतीमुळे … Read more

मराठी साहित्य संमेलनात खळबळ; कार्याध्यक्षांच्या तोंडाला फासले काळे

सातारा वृत्तसंस्था : साताऱ्यात सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आज एक खळबळजनक आणि धक्कादायक घटना घडली. संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या तोंडाला एका व्यक्तीने अचानक काळे फासल्याने साहित्य वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी कार्यक्रम सुरू असतानाच घडल्याने उपस्थित साहित्यिक, रसिक आणि आयोजक सर्वच स्तब्ध झाले. शुक्रवारी सकाळी साहित्यिक … Read more