1 डिसेंबरनंतर होतील हे ‘4’ मोठे बदल, थेट तुमच्या आयुष्यावर होतील परिणाम… जाणून घ्या काय आहे?

पुणे – सध्या दररोज अनेक गोष्टीत बदल होत आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक महिना काहीतरी नवीन घेऊन येत असतो. या वर्षाचा शेवटचा महिना सामान्य लोकांसाठी काहीतरी खास घेऊन येणार आहे. 1 डिसेंबर म्हणजेच चार दिवसांनंतर देशात चार मोठे बदल होणार आहेत. या बदलांचा थेट परिणाम तुमच्या आयुष्यावर होऊ शकतो. हे नवीन नियम जसे आपल्‍याला दिलासा देतील, तसेच … Read more

बंडखोर चंद्रशेखर भोयर यांची राष्ट्रवादीमधून हकालपट्टी

मुंबई : चंद्रशेखर ऊर्फ शेखर भोयर यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या अमरावतीतील अधिकृत उमेदवाराच्या विरोधात अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती माहिती प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी दिली आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेचे श्रीकांत देशपांडे यांना महाविकास आघाडीने अधिकृत उमेदवारी … Read more

आ. भारत भालके प्रकृती चिंताजनक? विचारपूससाठी शरद पवार जाणार रुबी हॉस्पिटलमध्ये

पुणे: पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांची प्रकृती आता चिंताजनक झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे रुबी हॉस्पिटलमध्ये जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.  यादरम्यान डॉक्टरांनीही प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. भारत भालके यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले. पोस्ट कोव्हिड त्रासामुळे त्यांच्या … Read more

कंगनाच्या ऑफिसवरील कारवाई उच्च न्यायालयाने ठरवली अवैध

मुंबई:  बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रनौतच्या कार्यालयावर मुंबई महापालिकने अनधिकृत असल्याचा ठपका ठेऊन कारवाई केली होती. मात्र, मुंबई हायकोर्टाने  मुंबई पालिकेची कारवाई अवैध असल्याचा म्हणत पालिकेचा जोरदार दणका दिला आहे.  कंगना रनौतच्या मुंबईतील कार्यालयावर 9 सप्टेंबरला महापालिकेचा हातोडा पडला होता. मुंबई महानगरपालिकेची ही कारवाई उच्च न्यायालयाने अवैध ठरवली आहे. महापालिकेने बजावलेली नोटीस आणि त्यानंतर तोडकामाचा काढलेला … Read more

हिंदुत्व सोडन म्हणजे धोतर नाही?; मुख्यमंत्र्यांचा भाजपसह राज्यपालांवर पलटवार

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष होत आहे. त्यानिमित्ताने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची रोखठोक मुलाखत घेतली आहे.  ही मुलाखत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘दैनिक सामना’मध्ये प्रसिद्ध होणार आहे. या मुलाखतीचा दुसरा प्रोमो खासदार संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे. दरम्यान, यामध्ये मंदिर उघडण्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेच्या … Read more

भर दिवसा मनसे पदाधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या

ठाणे : ठाण्यात भर दिवसा मनसे पदाधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. जमिल शेख मनसे पदाधिकारी यांचे नाव आहे.  मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांनी शेख यांच्या डोक्यात गोळी झाडली. त्यानंतर गंभीर अवस्थेत शेख यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. शव विच्छेदनासाठी त्यांना मुंबईतील जेजे रुग्णालयात हलवण्यात … Read more

महाराष्ट्रातील आणखी एका जवानाला वीरमरण

जळगाव: : महाराष्ट्रातील आणखी एक जवान जम्मू-काश्मीरमध्ये शहीद झाला आहे. श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पिंपळगाव (ता.चाळीसगाव) येथील यश देशमुख यांना वीरमरण पत्करावे लागले आहे. यश देशमुख हे ११ महिन्यांपूर्वी पुणे येथे सैन्य दलात पॅरा कंमाडो म्हणून भरती झाले होते. नऊ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून ते दोन महिन्यांपूर्वीच श्रीनगर येथे रूजू झाले होते. हा हल्ला … Read more

सत्तेचा दुरुपयोग करून अंगावर येणार असाल तर…..मुख्यमंत्री ठाकरेंचा इशारा

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला खणखणीत इशारा दिला आहे.  मी शांत आहे, संयमी आहे. पण याचा अर्थ मी काही नामर्द नाही,’ असा जबरदस्त इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केंद्र सरकारला दिला. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्याविरुद्ध ईडीनं केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा हा इशारा महत्त्वाचा … Read more

कार-टँकरच्या भीषण अपघातात वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यासह चार जणांचा मृत्यू

बीड : बीड जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला.  कार व ऑइल टँकरच्या भीषण अपघातात चार जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना गुरुवारी (दि.26) सकाळी दहा वाजेच्या सुमारास औरंगाबाद-बीड राष्ट्रीय महामार्गावरील गेवराई शहराजवळ घडलीय.  मृतांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांचा समावेश आहे. वंचित आघाडीचे लातूर जिल्हाध्यक्ष सदाशिव भिंगे यांच्यासह … Read more

पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी सदैव कटिबद्ध:- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई  : सण, उत्सव असो वा सभा असो जमलेल्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आमचे पोलीस चोवीस तास कर्तव्य बजावत असतात. स्वत:च्या कुटुंबातील, घरातील सुख दु:ख बाजूला ठेवून जनतेच्या सुख दु:खात सामिल होणाऱ्या आमच्या पोलिसांचा मला अभिमान आहे. पोलिस विभागाच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासन सदैव कटिबद्ध असून त्यांच्यासाठी जे जे करणे शक्य आहे ते सर्व करणारच आणि हे … Read more