---Advertisement---

नक्षलवादी व सुरक्षा दलामध्ये चकमक : आठ नक्षलवादी ठार

By team
On: April 3, 2024 11:13 AM
Follow Us:
---Advertisement---

गडचिरोली : वृत्तसंस्था

गडचिरोली जिल्ह्यातील कोरचोली भागात नक्षलवादी आणि सुरक्षा दलामध्ये झालेल्या चकमकीत आठ नक्षलवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षलवादी मोठा घातपात करण्याची शक्यता वर्तवली जात होती. या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या वतीने मोठी कारवाई करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी सहा वाजेपासून नक्षलवाद्यांसोबत जवानांची चकमक सुरू होती. या कारवाईत आठ नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. तसेच या चकमकीत अनेक स्वयंचलित शस्त्रे जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलाला मोठे यश मिळाले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील कोरचोली भागात आज सकाळपासूनच नक्षलवादी आणि सुरक्षारक्षकांमध्ये चकमक सुरू होती या चकमकेमध्ये आठ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले आहे. यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा कट उधळण्यात सुरक्षा यंत्रणा यशस्वी झाल्या असल्याचे बोलले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!