---Advertisement---

भाविकांना आनंदाची बातमी : अक्कलकोट – तुळजापूर नवीन बस सेवेचा शुभारंभ !

By team
On: September 15, 2024 10:15 AM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

, दि.१५ : १२ सप्टेंबरपासून अक्कलकोट आगाराने अक्कलकोट ते तुळजापूर या नविन बस सेवेचा शुभारंभ केला.खास भाविकांच्या सेवेसाठी ही सेवा सुरू केल्याचे विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यांनी सांगितले. प्रारंभी या बसचे उद्घाटन सोलापूर विभाग नियंत्रक गोंजारी,विभाग वाहतुक अधिकारी अजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यापूर्वीही गाड्या होत्या परंतु थेट अक्कलकोट ते तुळजापूर अशी गाडी सुरू करावे,अशी मागणी भाविकांची होती.

पूर्वी सोलापूर मार्गे किंवा तुळजापूर डेपोच्या गाड्यांमधून प्रवास करावा लागत होता.या कार्यक्रमास आगार प्रमुख मदनीपाशा जुनेदी, सहायक वाहतुक अधिक्षक जयसिंग चव्हाण, लेखाकार श्रीकांत कोप्पा,संजू कांबळे, वाहतूक नियंत्रक मदन घाडगे, श्रीमंत खसगी,अनिल पाटील,प्रशांत फडतरे आदिंसह प्रवाशी उपस्थित होते.
सदर बस अक्कलकोट बस स्थानक वरून- ७.५० आणि १४.०० वा. सुटणार  तसेच तुळजापूर बस स्थानक वरून – १०.३० आणि १६.४५ वाजता सुटेल. या बसला शासनाच्या सर्व सवलत लागू आहेत .प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आगार प्रमुख जुनेदी यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!