---Advertisement---

अक्कलकोट येथे शेतकऱ्यांसाठी हरभरा हमीभाव केंद्र सुरू

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.२१ : शेतकऱ्यांसाठी अक्कलकोट येथे सोमवारपासून शासकीय हमी भाव सुरू करण्यात आले आहे. याद्वारे हरभरा खरेदीस सुरूवात झाली असून याचे उद्घाटन अक्कलकोट बाजार समितीचे गौरीशंकर मजगे, वेअर हाऊस अधिक्षक कांबळे, जिल्हा मार्केटींगचे विश्वनाथ कांदे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सलगरचे सरपंच संजय डोंगराजे, किणीचे माजी सरपंच अण्णप्पा अळ्ळीमोरे, माजी प्राचार्य डॉ.कोनापूरे, जे.एन.ग्रुपचे बाबासाहेब सोनकांबळे, किणी सोसायटी चेअरमन वैजीनाथ अळ्ळीमोरे, सचिव संतोष कांबळे, केंद्र प्रमुख नारायण भोसले आदींसह शेतकरी बांधवही उपस्थित होते.

यावेळी बोलताना चेअरमन अळ्ळीमोरे यांनी बाजार भावापेक्षा शासकीय हमी भाव सातशे-आठशे रूपये जास्त असल्यामुळे तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले यासाठी शेतकऱ्यांनी ७०३८३४८४०६ या मोबाईल नंबरवर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!