---Advertisement---

पिकसाठी निघाले बसचा भीषण अपघात : १२ जण ठार तर २५ जखमी !

By team
On: January 3, 2024 10:41 AM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशभरात नव्या वर्षाचे स्वागत होत असतांना अनेक ठिकाणी अपघाताच्या अनेक घटना समोर आल्या आहे. नुकतेच आसाममधील गोलाघाट जिल्ह्यात बुधवारी सकाळी एक भीषण अपघात झाला. प्रवासी बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २५ जण जखमी झाले आहेत. जखमींमधील अनेकाची स्थिती नाजूक आहे. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याचा धोका वर्तवला जात आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार गोलाघाट जिल्ह्यातील देरगाव परिसरात हा अपघात झाला आहे. बसमध्ये ४५ जण प्रवास करत होते. सर्वजण पिकसाठी निघाले होते. मात्र पहाटे ५ वाजेच्या सुमारास समोरुन येणाऱ्या ट्रक आणि बसची जोरदार धडक झाली. धडक इतकी जोरदार होती, बसचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. यामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये लहान मुले आणि महिलांचाही समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बसमधील सर्व प्रवासी तिनसुकिया येथील तिलिंगा मंदिरात पिकनिकसाठी जात होते. जखमींना सध्या जोरहाट मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातात प्राण गमावलेल्या १२ प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!