---Advertisement---

कर्नाटक राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यावर करडी नजर, दुधनी चेकपोस्टवर कडक बंदोबस्त

Follow Us:
---Advertisement---

दुधनी  : कर्नाटकच्या बेंगळुरुमध्ये कोरोनाचे नवीन म्युटंट ‘ओमिक्रॉनच्या दोन रुग्ण आढळल्याचा नंतर राज्य सरकारने सावधगिरीचा उपाय म्हणून कोरोना संदर्भातील नवीन नियमावली जारी केली आहे. परराज्यातुन महाराष्ट्रात येणार्यांना कोरोनाचे दोन्ही डोस किंवा आरटीपीसीआर रिपोर्ट बंधनकारक करण्यात आले आहे. त्या पार्ष्वभुमीवर सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी मनिषा आव्हाळे यांनी आज दुधनी येथील कर्नाटक-महाराष्ट्र सिमेवरील चेकपोस्टला भेट देत येथील परिस्थितीचा आढावा घेतला आणि तपासाणीच्या कामात हयगय न करण्याची सक्त ताकित त्यांनी येथील कर्मचार्यांना दिला.

कोरोना विषाणूच्या उत्परिवर्तीत ओमायक्रॉनचा संसर्ग होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने तातडीने कडक पावले उचलली आहेत. दुधनी – गाणगापुर या मार्गावर कर्नाटकातून येणारे प्रवासी कोरोना नियमांचे पालन न करताच महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणार्याे प्रवाशांचे दोन डोस व आरटीपीसीआर तपासणी करूनच कर्नाटकात सोडले जाते. मात्र दुधनी ते अफझलपुर व दुधनी ते रेवुर, दुधनी ते निंबाळ या मार्गाने कर्नाटकातून शेकडो प्रवासी खूप मोठ्या संख्येने कोणतीही तपासणी न करता महाराष्ट्रात येतात. याचाच एक भाग म्हणून अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील सर्व सिमांवर तपासणी नाके सुरु करण्यात आली आहे. याठिकाणी कर्नाटकातुन महाराष्ट्रात येणार्यात दुचाकी, चारचाकी त्याबरोबरच कर्नाटकच्या एसटी बसमधुन येणार्या प्रत्येक प्रवाश्याची कसुन तपासाणी केली जात आहे. यासाठी पोलिस, आरोग्य कर्मचार्यांबरोबरच स्थानीक नगरपालिका कर्मचार्यांची नेमणुककरण्यात आली आहे.

सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी मनिषा आव्हाळे बोलताना म्हणाले कि, दुधनी येथील चेकपोस्टवर कर्नाटकातुन महाराष्ट्रात येणारे नागरीक कोविड प्रतिबंधात्मक लस घेतले आहे, कि नाही हे तपासले जाते. जर लस घेतला नसेल तर अशा नगरिकांसाठी लसिकरणाची सोय देखील करण्यात येणार आहे, सद्याच्या घडिला पोलिस कर्मचार्यांची संख्या कमी आहे. अतिरिक्त पोलिसांची मागणी आम्ही शसनाकडे केली आहे. ते ल;अवकरच उपलब्ध होणार आहे असे त्यांनी सांगीतले.

यावेळी तहसिलदार बाळासाहेब शिरसाट, तालुका आरोग्य विस्तार अधिकारी महेश भोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विन करजखेडे. तालुका सुपरवायझर शिवाजी चंदनशिवे, डॉ. गजानन मारकड आरोग्य अधिकारी वागदरी, डॉ.मंजुनाथ पाटील, आरोग्य सेवक संतोष माशाळे, राजेंद्र चौगुले, विलास पोतदार, दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितिचे सभापती प्रथमेश म्हेत्रे, गुरुशांत हबशी, दुधनी नगरषदेचे लेखाधिकरी विशाळ चव्हाण, राणी दांईगडे, चन्नमल्ल पाटील, रामचंद्र अत्ते यांच्यासह इतर कर्मचारी आणि अधिकारी उपस्थीत होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!