---Advertisement---

मुंडेसाहेबांची लेक दिल्ली गाजवणार ; मुख्यमंत्री शिंदे

By team
On: May 8, 2024 3:23 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

देशात लोकसभा निवडणुकीचा धडाका सुरु असून राज्यातील अनेक जिल्ह्यात नेत्यांच्या सभा देखील होत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या देखील सभेला जोर येत असतांना नुकतेच मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

आमच्याकडे मोदी नावाचा सर्वात मोठा अणुबॉम्ब आहे. आमच्याकडचा अणुबॉम्ब घरात घुसून मारतो, असं वक्तव्य करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. तर दिल्ली गाजवणार मुंडेसाहेबांची लेक, कुठून आली तुतारी चल उचलून फेक असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी शरद पवार गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

पंकजा मुंडे यांनी मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मत, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. इतंकच नाहीतर ४ जूननंतर विरोधकांची लंका खाक होणार आणि तुतारीची पिपाणी होणार असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी शरद पवारांवर खोचक टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीरसभा घेतली. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळाले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!