---Advertisement---

लेबर फेडरेशनचे नूतन संचालक रोहिदास राठोड यांचा सत्कार

By team
On: February 6, 2024 9:02 AM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनच्या निवडणुकीत अक्कलकोटमधून समर्थनगर ग्रामपंचायतीचे सदस्य रोहिदास राठोड बिनविरोध संचालक झाले आहेत.त्यानिमित्त सोमवारीरोहिदास राठोड मित्र परिवाराच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

समर्थ नगर येथे झालेल्या या सत्कार कार्यक्रमास योगीराज हिरेमठ,लाला राठोड,मोहनचव्हाण, विलास राठोड आप्पाराव चव्हाण,जितेंद्रकुमार जाजू,मोनेश्वर नरेगल,सुनील सोनटक्के,सलमान पठाण,अभिषेक बनसोडे,तौफिक मुल्ला आदींची उपस्थिती होती. राठोड यांच्या रूपाने बंजारा समाजाला न्याय मिळाला असल्याचे उद्योजक लाला राठोड यांनी सांगितले.सत्काराला उत्तर देताना नूतन संचालक राठोड म्हणाले,सध्या अक्कलकोट तालुक्यात ९० मजूर संस्था आहेत.त्यापैकी ३४ चालू स्थितीत आहेत.

काही संस्था कामाअभावी बंद आहेत काहींचे ऑडिट नाही.वेगवेगळी कारणे आहेत.त्याचा अभ्यास करून त्या चालू कशा राहतील.त्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे.यासाठी लवकरच बैठक देखील घेणार आहे.सर्व संस्थांना काम देऊ.मजूर संस्थेचे अध्यक्षांनी जो विश्वास माझ्यावर टाकला आहे.तो सार्थ ठरविणार आहे.बिनविरोध करण्यासाठी अनेक नेते मंडळीं व हितचिंतकांनी प्रयत्न केले.त्यांचे मी आभार मानतो त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!