---Advertisement---

अक्कलकोटसाठी अभिमानाचा क्षण : अयोध्येतील कार्यक्रमाचे डॉ.पुरुषोत्तम राजीमवाले यांना निमंत्रण

By team
On: January 4, 2024 10:23 AM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

अयोध्या येथे २२ जानेवारी रोजी पार पडणाऱ्या रामलल्ला मंदिराच्या कार्यक्रमासाठी शिवपुरी विश्व फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ.पुरुषोत्तम राजीमवाले यांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रण आले आहे.

सध्या देशभरात राम मंदिराच्या कार्यक्रमाविषयी मोठी उत्सुकता आहे आणि त्या अनुषंगाने घराघरात गावागावात मूर्तिकलश आणि त्याविषयीच्या जनजागृती कार्यक्रमांना गती प्राप्त झाली आहे अशामध्ये शिवपुरी येथील डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले यांना कार्यक्रमासाठी अतिथी म्हणून देण्यात आले आहे.

डॉ.राजीमवाले हे शिवपुरी विश्व फाउंडेशनच्या माध्यमातून जगभर अग्निहोत्राचा प्रचार आणि प्रसार करत आहेत.शिवपुरी हे अग्निहोत्राचे मूळ केंद्र आहे. जगभरात अनेक शाखांच्या माध्यमातून जगाला सुख,शांतता आणि समृद्धीचा संदेश देण्यात येत आहे. राम मंदिर मूर्ती प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमाला अक्कलकोटमधून डॉ.राजीमवाले यांना निमंत्रण मिळाल्याने अक्कलकोटवासियांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. याबाबत बोलताना डॉ.राजीमवाले म्हणाले, राम मंदिर संपूर्ण देशासाठी आस्थेचा विषय आहे त्या कार्यक्रमाचे निमंत्रण मला आल्याने आत्यानंद झाला आहे अक्कलकोटसाठी देखील हे अभिमानाची गोष्ट आहे, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!