---Advertisement---

५ वर्षांनी फुटली अत्याचाराला वाचा : गुंगीचे औषध देवून केले होते कृत्य !

By team
On: November 23, 2023 9:39 AM
Follow Us:
---Advertisement---

बीड : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक जिल्ह्यात अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर अत्याचाराच्या घटनेत सातत्याने वाढ होत असतांना नुकतेच एक धक्कादायक प्रकरण समोर बीड जिल्ह्यातून समोर आले आहे. यात तब्बल ५ वर्षांनी या अत्याचाराला वाचा फुटली आहे. अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत, एप्रिल २०१८ मध्ये वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी अखेर पीडितेच्या फिर्यादीवरून अंभोरा पोलिस ठाण्यात २० नोव्हेंबर, २०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, दहावीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीला बोर्ड परीक्षेच्या शेवटच्या पेपरच्या दिवशी गावातील एका तरुणाने प्रपोज केल्यानंतर तिने त्याकडे दुर्लक्ष केले. नंतर काही दिवसांनी ती शेतात जाताना फोन कर, नसता मी घरी येईन, अशी धमकीवजा मोबाइल नंबर लिहिलेली चिठ्ठी देत, तिला घरी बोलावून गुंगीचे औषध देत, एप्रिल २०१८ साली अत्याचार केला. अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केला. परंतु भीतिपोटी मुलगी काहीच बोलली नाही. मागील वर्षी मुलीचे लग्न झाल्यावर सोशल मीडियावर फेक अकाउंट बनवून हा तरुण तिला व तिच्या नवऱ्याला मेसेज करू लागल्याने, त्याच्यावर महिलेच्या पतीने जानेवारी, २०२३ मध्ये अहमदनगर पोलिसांत माहिती व तंत्रज्ञान अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला होता. पतीने तिला जाब विचारल्यावर ती घाबरून गेली होती. अखेर २१ वर्षीय पीडितेने सोमवारी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी आरोपी सागर शहदेव रक्ताटे याच्याविरुद्ध अत्याचार, अनुसूचित जाती जमाती, पॉक्सो कलमानुसार गुन्हा दाखल केला. आरोपी फरार आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!