---Advertisement---

मुदत संपल्याने अक्कलकोट येथील सेतू कार्यालय बंद ; दाखल्यांसाठी आता महा ई सेवा केंद्रांशी संपर्क साधण्याचे आवाहन

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.१ : सेतू ठेक्याची मुदत संपल्यामुळे अक्कलकोट येथील सेतू कार्यालय बंद करण्यात आले आहे,अशी माहिती तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांनी दिली.

सदर सेतूमधील दाखले, प्रतिज्ञापत्र व इतर सुविधा यांचे नवीन अर्ज आता महा-ई-सेवा केंद्राद्वारे स्वीकारले जाणार आहेत. नागरिकांनी आता आपले दाखले,  प्रतिज्ञापत्र व इतर सुविधा जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र व महा ई सेवा केंद्रामध्ये सादर करावेत, असे आवाहन तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांनी केले आहे. महा ई सेवा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्रांची यादी संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!