---Advertisement---

सोलापूर जिल्हा युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी समाधान होटकर

By team
On: July 9, 2024 2:51 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

सोलापूर जिल्हा युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी दहिटणे (ता. अक्कलकोट ) येथील युवा कार्यकर्ते समाधान होटकर यांची निवड करण्यात आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे व नूतन खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.

यावेळी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशपाकभाई बळोरगी, माजी  सभापती सिद्धार्थ गायकवाड यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.होटकर हे गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. शिंदे परिवाराचे निकटवर्तीय देखील आहेत. अक्कलकोट तालुक्यामध्ये युवा वर्गात त्यांची मोठी क्रेझ आहे.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी चांगले काम केल्यामुळे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी व माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी त्यांच्यावर मोठा विश्वास दाखवत युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड केली आहे.

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रीय नेते राहुल गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेसच्या माध्यमातून सर्वसामान्य युवकांचे हक्काचे व्यासपीठ बळकट करण्यासाठी या पुढच्या काळातही आपण काम करू आणि काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहू.तसेच काँग्रेस पक्षाची विचारधारा ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करू. आगामी विधानसभा निवडणुकीत देखील काँग्रेसच्या विजयासाठी तालुक्यात जीवाचे रान करू, असे निवडीनंतर समाधान होटकर यांनी सांगितले.होटकर यांच्या निवडीबद्दल माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे,माजी आमदार दिलीप माने, काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष नंदकुमार पवार, शहराध्यक्ष चेतन नरोटे,अशपाक बळोरगी,मल्लिकार्जुन पाटील,काँग्रेसचे शहराध्यक्ष रईस टिनवाला आदींनी अभिनंदन केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!