---Advertisement---

सोलापूर : देवदर्शनवरून परतताना चारचाकीचा अपघात : एक ठार तर तीन गंभीर

By team
On: July 8, 2024 10:09 AM
Follow Us:
---Advertisement---

सांगोला : वृत्तसंस्था

पंढरपुरवरून देवदर्शन करून परत कारने कोल्हापूरला येत असताना कार व जीपची समोरासमोर धडक झाल्याने कारमधील कोल्हापुरच्या भाविकाचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील तिघे जखमी झाले. हा अपघात रविवारी (दि.७) दुपारी २.५० च्या सुमारास पंढरपूर- सांगोला रोडवर फॅबटेक कॉलेज समोर घडला. मुकुंद मनोहर पाटील (वय-५६ वर्षे, रा.कोल्हापूर) असे अपघातातील मृताचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुकुंद मनोहर पाटील हे अन्य तिघांसह पंढरपूरला देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शन करून परत कोल्हापूरला येत होते. यादरम्यान सांगोला-पंढरपूर रोडवर फॅबटेक कॉलेजजवळ त्यांची कार आली असता सांगोल्याकडून पंढरपूरच्या दिशेने समोरून आलेल्या पिकअप जीपने कारला समोरून जोराची धडक दिली. या अपघातात मुकुंद मनोहर पाटील यांचा मृत्यू झाला. तर कारमधील अन्य तिघे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची फिर्याद सांगोला ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. साळे यांनी दिली असून याबाबत पुढील तपास सांगोला पोलीस करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!