---Advertisement---

भरधाव चारचाकीने ७ जणांना चिरडले : दोन ठार

By team
On: June 18, 2024 10:04 AM
Follow Us:
---Advertisement---

नागपूर : वृत्तसंस्था

उपराजधानीत भरधाव कारचालकांच्या बेदरकारपणाचे सत्र सुरूच आहे. रविवारी मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास एका कारचालकाने फुटपाथवर झोपलेल्या ७ जणांना चिरडले. त्यात दोघांचा मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी आहेत. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघोरी चौकाजवळ हा अपघात झाला.

वाढदिवसाची पार्टी करून ७ मित्र कारने घरी परतत होते. हे सर्वजण दारू प्यायले होते. दरम्यान, उमरेड मार्गाकडे जाणाऱ्या भरधाव कारच्या चालकाचे नियंत्रण सुटले व कार थेट फुटपाथवर चढली. यावेळी रस्त्यावर खेळणी विकून उदरनिर्वाह करणारे फुटपाथवर झोपले होते. त्यांच्या अंगावरून ही कार गेली. यात ३ महिला, ३ मुले व एक पुरुष जखमी झाला. यात एका महिलेचा घटनास्थळी, तर पुरुषाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने जखमींना रुग्णालयात नेले. त्यानंतर पसार झालेल्या सातही आरोपींचा शोध घेऊन त्यांच्याविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!