---Advertisement---

सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ शाळेला देणार जरांगे पाटलांचे नाव

By team
On: June 12, 2024 10:30 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या काही महिन्यापासून मनोज जरांगे पाटील लढा देत असून त्यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरु केले असून आता मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर चित्रपट येत आहे. संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील आणि मर्द मावळा शिवरायांचा वाघ हे चित्रपट याच महिन्यात प्रदर्शित होत आहे. त्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांची संघर्षकथा मांडण्यात आली आहे. आता मनोज जरांगे यांचे नाव शाळांनाही देण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील शाळेला मनोज जरांगे पाटील यांच नाव देण्याचा ठराव मंजूर झाला आहे. बार्शी तालुक्यातील जय जगदंब शिक्षण संस्थेने मुंगशी विद्यालयाला जरांगे पाटील यांचं नाव देण्याचा ठराव करण्यात आला.

जय जगदंब शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अंतरवली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर तुमचे नाव शाळेला देण्याची अनुमती मिळावी यासाठी पत्र दिले आहे. तसेच जरांगे पाटील यांना नामांकरण सोहळ्याचे सुद्धा निमंत्रण संस्थेनेकडून देण्यात आले आहे. याबाबत मनोज जरंगे पाटील यांच्याकडून शिक्षण संस्थेला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील हे स्वतः या नामकरण सोहळ्याला उपस्थित असणार असल्याचे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर कपिल कोरके सांगितला आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच शाळेला नाव देण्याचा पहिला मान सोलापूर जिल्ह्याला भेटला आहे.बार्शी तालुक्यातील मुंगशी या गावामध्ये 1998 साली या विद्यालयाची स्थापना करण्यात आली होती.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!