---Advertisement---

निवडणूक जिंकायची म्हणून सुनेला परकी म्हणता ; मंत्री मुंडेंचा हल्लाबोल

By team
On: April 28, 2024 10:04 AM
Follow Us:
---Advertisement---

बारामती : वृत्तसंस्था

बारामतीमध्ये महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत धनंजय मुंडे बोलत होते. त्यांनी केलेल्या या विधानाची सध्या चर्चा रंगली आहे. निवडणूक जिंकायची म्हणून सुनेला परकी म्हणता. तुम्ही इतके निगरगट्ट कसे झालात? असे म्हणत मंत्री धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

सभेत बोलताना धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, ”एक निवडणूक जिंकण्यासाठी शरद पवार सुनेला परकं म्हणाले. आज त्यांच्या घरातही मुली आहेत. त्या मुली उद्या सून म्हणून कोणाच्यातरी घरी जातील. कुणाचीतरी लेकी उद्या सून म्हणून त्यांच्या घरता येईल. मात्र, फक्त एक निवडणूक जिंकण्यासाठी कोणी आपल्या सुनेला परकं म्हणत असेल, तर राजकारणात एवढी वाईट वेळ कुणावरही येऊ नये”, असा टोला धनंजय मुंडे यांनी लगावला.

याशिवाय यावेळी बोलतांना धनंजय मुंडे यांनी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे. ”मागच्या 15 वर्षात तीन वेळा खासदार राहिलेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या नेत्या, जगप्रसिद्ध संसदरत्न यांनी आपल्या कल्पनेतून एकतरी प्रकल्प बारामतीत आणला का?”, असा खोचक सवाल धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!