---Advertisement---

सोलापूर जिल्हा काँग्रेसमध्ये धवलक्रांतीचे पर्व सुरू..!

Follow Us:
---Advertisement---

सोलापूर, दि.९ : सोलापूर जिल्हा काँग्रेसचे नूतन अध्यक्ष डाॅ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास काँग्रेस भवन मध्ये येऊन पदभार घेतला.वाजत-गाजत पारंपारिक पद्धतीने त्यांचे काँग्रेस भवनात स्वागत करण्यात आले.काँग्रेस भवनाला मागील दोन दिवसापासून सजवण्यात आले होते गुलाबाच्या पाकळ्यांनी त्यांचे स्वागत झाले,

जिल्हाध्यक्ष डाॅ.धवलसिंह मोहिते -पाटील यांचे कार्यालयात प्रवेश होताच माजी आमदार रामहरी रुपनर, शहर अध्यक्ष प्रकाश वाले, गटनेते चेतन नरोटे, ॲड.अर्जून पाटील, संदीप साठे, भिमाशंकर जमादार,बाळासाहेब शेळके, दक्षिण सोलापूरचे नेते डाॅ.बसवराज बगले यांनी धवलसिंह मोहिते-पाटील यांना जिल्हाध्यक्षांच्या खुर्चीवर बसवले.
त्यानंतर माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, कार्याध्यक्ष अशपाक बळोरगी,शहर कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार यांनी त्यांचा सत्कार केला.

तुळशीचा मोठा पुष्पहार घालून, मानाचा फेटा बांधून धवलसिंह मोहिते पाटील यांचा भीमराव बाळगे,अभिराज शिंदे,मेहबूब तांबोळी, सुधीर रास्ते,आदींनी सत्कार केला.त्यानंतर डाॅ.बसवराज बगले यांनी आपल्या प्रस्तावनेत, डाॅ.धवलसिंह मोहिते पाटील यांच्या रुपाने जिल्हा काँग्रेस कमिटीला कणखर नेतृत्व लाभले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये शंभर हत्तीचे बळ आले आहे. असे प्रतिपादन केले.

यावेळी महिला जिल्हा अध्यक्षा शाहीन शेख, बाळासाहेब शेळके, माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे, प्रदेश उपाध्यक्ष रामहरी रूपनर यांची भाषणे झाली.

त्यानंतर बोलताना, विस्कळीत झालेल्या काँग्रेसला पुन्हा घडी बसविण्यासह जिल्ह्यातील सर्व नेत्यांशी समन्वय ठेवून काँग्रेसला जिल्ह्यात उभारी देईन असे धवलसिंह मोहिते -पाटील यांनी सांगितले. त्यांनी आपल्या कामकाजाची पद्धत पुढील काळात कशा पद्धतीने राहिल याची माहिती दिली.शेवटी शिवयोगी बिराजदार यांनी आभार मानले,अशोक कस्तुरे यांनी सूत्रसंचालन केले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!