---Advertisement---

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले अक्कलकोटच्या ‘या’ कार्यकर्त्याचे कौतुक

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट,दि.४ : (प्रतिनिधी) देशाचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी रिपाई अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांना पत्राद्वारे कौतुकाची थाप दिली आहे.


आगामी झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत रिपब्लिकन पक्षाचे ३६ ग्रामपंचायत सदस्य निवडून आले आहेत यात प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ सरवदे यांच्या नेतृत्वात रिपाई तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांनी संपूर्ण तालुक्यातील सर्व समाजाला एकत्र घेऊन ३६ पैकी १२ उमेदवार बिनविरोध व २४ उमेदवार निवडुन आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत.अशा चळवळीतील कार्यकर्त्यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे अशी कौतुक थाप आठवले यांनी पत्राद्वारे दिली आहे.त्यांच्या या शाबासकीने कार्यकर्त्यांत उत्साह संचारला आहे. तसेच अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयाच्या सदस्यपदी त्यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!