---Advertisement---

दहिटणे येथे सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

On: January 23, 2021 3:13 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट  : अक्कलकोट तालुक्यातील दहिटणे येथे सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या  हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते समाधान होटकर, दिलीप व्हट्टे, माजी सरपंच चन्नवीर बोधले, मेजर अमोल माने,पोलीस पाटील भीम म्हेत्रे, तानाजी सुरवसे, पंडित मोरे, श्याम शिंदे, संस्थेचे सचिव विजय पाटील, युवा नेते समाधान होटकर,  राजेंद्र माने, भरत राजेगावकर,श्रीकांत चौधरी,  राजेंद्र मोरे, डिगंबर राजेगावकर, ग्रामपंचायत सदस्य सागर कांबळे, तंटामुक्त अध्यक्ष नितीन मोरे,  विक्की बाबा चौधरी, ग्रामसेवक शिवलिंगप्पा वंगे, बाबासाहेब मोरे, ताहीर शेख आदींची उपस्थिती होती.

या स्पर्धेसाठी पारितोषिक दिलेले मान्यवर  गोकुळ माऊली शुगर लिमिटेड व्हाईस चेअरमन गोकुळ शिंदे यांनी प्रथम पारितोषिक दिले.द्वितीय पारितोषिक  धनराज व्हट्टे व तृतीय पारितोषिक युवा नेते समाधान होटकर यांनी दिले. क्रिकेटचे सामने भरवण्याकरता मैदानाची कमतरता असताना स्व.बाबासाहेब लोंढे पाटील यांचे सुपुत्र बाळराजे लोंढे पाटील यांनी  स्वतःची शेती क्रिकेट स्पर्धेसाठी दिली.

या कार्यक्रमाचे आयोजन धनंजय  कांबळे, बालाजी शिंदे, शंतनू पाटील, किशोर पवार, विष्णू कांबळे, दिपक कांबळे यांनी केले होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!