---Advertisement---

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मैंदर्गीत वक्तृत्व स्पर्धा

On: January 23, 2021 4:25 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट :  हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मैंदर्गीत वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला दिप प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर स्वांतत्र्यसेनानी सुभाषचंद्र बोस व हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुजन मैंदर्गीच्या विद्यमान उपनगराध्यक्षा राजश्री निंबाळ व माजी नगराध्यक्ष तुकप्पा नागूर यांच्या हस्ते करण्यात आले.

वक्तृत्व स्पर्धेत नव युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. बाळासाहेब ठाकरे,शेतकरी आत्महत्या व त्यावर उपाय, युवकांनी राजकारणात यावे का?या विषयात स्पर्धकांनी उत्तम प्रकारे आपले मत व्यक्त करत होते.यावेळी परिक्षक म्हणून श्री.शिवचलेश्वर महाविद्यालयाचे प्रा. आंदेवाडी व प्रा. कहर यांनी काम पाहिले.

या वक्तृत्व स्पर्धेत, प्रथम क्रमांक- ऐश्वर्या नागूर (रक्कम 1001), द्वितीय क्रमांक- शिवराज जकापूरे (501), तृतीय क्रमांक- जयश्री बाणी(251) यांनी विजेतेपद पटकावले.

यावेळी बोलताना तुकाप्पा नागूर म्हणाले कि, युवकांनी मोबाईल  सारख्या उपकरणांत गुंतून न जाता या सारख्या स्पर्धेसारख्या विविध उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवून आपले कौशल्य वाढवावे.

या कार्यक्रमाला मैंदर्गी नगरपरिषदेचे नगरसेवक लक्ष्मण बुरूड, राम निंबाळ, विठ्ठल आरेनवरू, बसण्णा देगांव, निलकंठ मेंथे,दादा कौलगी, शेखर दिवटे आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गणेश गोब्बूर व आभार प्रदर्शन नगरसेवक सिद्धाराम बिराजदार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय सेनेचे  तालुकाध्यक्ष योगेश फुलारी, सागर पेडसंगी, अनिल बिराजदार, सागर भिंगोळी, यश गुत्तेदार, दौलप्पा कोळी, मल्लीनाथ गोब्बूर, सुरेश नागूर आदींनी परिश्रम घेतले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!