मुखपृष्ठ ताज्या बातम्या राजकीय राज्य सोलापूर अक्कलकोट शैक्षणिक क्रीडा प्रेरणादायी कृषी पर्यटन वाढदिवस विशेष नोकरी संदर्भ

---Advertisement---

२६ जानेवारीपासून म्हैसलगे प्रिमीयर लीगचे आयोजन

On: January 23, 2021 7:35 PM
Follow Us:
---Advertisement---

पानमंगरुळ (प्रतिनिधी): अक्कलकोट तालुक्यातील म्हैसलगी येथील कै. भिमाशंकर गणपतराव भिसे – पाटील यांच्या स्मरणार्थ व उद्योगपती सुखदेव भिसे – पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दि. २६ जानेवारी २०२१ पासून म्हैसलगे प्रिमीयर लिगचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा टेनिस चेंडूवर, बाद पद्धतीने खेळवले जातील. तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात प्रथमच एवढ्या मोठ्या रकमेची क्रिकेट स्पर्धा म्हैसलगी सारख्या खेड्यात भरवली जात आहेत. यावेळी इंडीचे माजी आमदार रविकांत पाटील, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य शिवानंद पाटील उपस्थित राहणार आहेत.

प्रथम पारितोषिक : १,५१,०००/₹ – सोमनाथ महादेव भिसे पाटील यांच्या कडून

व्दितीय पारितोषिक : १, ०१, ०००/₹ – राज सुखदेव भिसे पाटील यांच्या कडून

तृतीय पारितोषिक : ५१, ०००/₹ – करत नागनाथ वाघमारे यांच्या कडून

याव्यतिरिक्त सलग तीन बळी, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट यष्टिरक्षक, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक व उत्कृष्ट झेल साठी कुलर बक्षीस ठेवण्यात आले आहेत.

अंतिम सामन्यासाठी सुखदेव भिसे पाटील यांच्या कडून – एलईडी टीव्ही (मालिकावीर), मोबाईल(सामनावीर), कुलर(सलग तीन षटकार व सलग तीन चौकार)

तरी जास्तीत जास्त क्रिकेट संघानी सहभागी व्हावेत,  इच्छुक संघानी २५ जानेवारी पर्यंत प्रकाश बिराजदार (९१५८९३७८०८), रमेश माशाळे (९९७०१८७५५५), गंगाधर कोळी(७७७५८७९४४४) यांच्या शी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment