---Advertisement---

अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या घरच्या कंपाऊंड जवळ आढळला तस्कर जातीचा साप

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट दि.११ : अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या अक्कलकोट येथील घरच्या कंपाऊंड जवळ तस्कर जातीचा बिन विषारी साप आढळून आला आहे.

या संदर्भातील अधिक माहिती अशी की, शनिवारी (दि. १० जुलै) रोजी रात्री साडे अकरा वाजता आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या घरच्या कंपाऊंड जवळ तस्कर जातीचा बिन विषारी साप आढळून आला. साप आढळताच आमदार कल्याणशेट्टी यांचे बंधू नगरसेवक मिलन दादा कल्याणशेट्टी यांनी सर्पमित्र शिवराज कोळी यांना फोन करून याची माहिती दिली. त्यानंतर सर्पमित्र शिवराज कोळी, सहकारी सर्पमित्र विपुल गवंडी आणि त्यांच्या टीमने वेळ वाया न घालवता आमदार कल्याणशेट्टी यांच्या निवासस्थान गाठले.

सर्पमित्र शिवराज कोळी आणि त्यांचे सहकाऱ्यांनी शोध घेऊन सापाला कुठल्याही प्रकारची इजा न करता सुखरूप पकडले. त्यानंतर त्या सापाला निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले. याची नोंद पुण्यातील वनविभागाकडे करण्यात आली आहे, अशी माहिती सर्पमित्र शिवराज कोळी यांनी दिली.

आता पावसाळ्याचे दिवस असल्याने सापाच्या बिळात पाणी शिरल्याने साप बाहेर पडतात. अशावेळी सापांना जीवे न मारता आपल्या जवळील सर्पमित्रांना फोन करून माहिती द्यावी. आणि त्यांना त्यांच्या निसर्गाच्या सानिध्यात सोडून देण्यास मदत होईल, असे आवाहन सर्प मित्र कोळी यांनी व्यक्त केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!