---Advertisement---

कोतवालांच्या राज्यव्यापी संपास अक्कलकोट संघटनेचा पाठींबा,अक्कलकोट कोतवाल संघटनेकडून तहसीलदाराना निवेदन

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट  : राज्यव्यापी कोतवाल संघटनेकडून येत्या १५ ऑगस्टपर्यंत कोतवालांच्या मागण्या मान्य न झाल्यास १६ ऑगस्टपासून राज्यात ठिक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलने केली जाणार आहेत.  त्याचाच एक भाग म्हणून अक्कलकोट तालुका कोतवाल संघटनेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. या राज्यव्यापी संपाला अक्कलकोट संघटनेचा पाठींबा असल्याचे तालुकाध्यक्ष शफील वाडीकर यांनी यावेळी सांगितले. 

कोतवाल संवर्गास चतुर्थ श्रेणी देण्यात यावी, चतुर्थ श्रेणी मिळेपर्यंत वेतनातील अन्यायकारक भेदभाव दूर करून समान काम, समान वेतन या धर्तीवर राज्यातील कोतवालाना सरसकट १५ हजार वेतन देण्यात यावे.  कोतवाल संवर्गातील  दि.०६/०२/२०१९ रोजी शासन निर्णयाबाबत पत्र क्र. ११२ ई १० मार्गदर्शन पत्र रद्द करण्यात यावे, कोतवालांना तलाठी व तत्सम पदामध्ये ५० टक्के आरक्षण देण्यात यावे, शिपाई संवर्गाच्या सर्व रिक्त जागा कोतवाल संवर्गातून शंभर टक्के पदोन्नती भरणे, कोरोना सारख्या महामारीत कोरोनाने मरण पावलेल्या कोतवालांच्या जागी अनुकंपा तत्वावर त्यांच्या वारसांना नियुक्ती करण्यात यावे, सेवानिवृत्तीनंतर कोतवालास कुठलाही शासकीय लाभ नसल्याने सेवानिवृत्तीनंतर कोतवालास १० लाख रुपये एकरकमी निर्वास भत्ता देण्यात यावा, अशा विविध मागण्या संदर्भात राज्यव्यापी संप पुकारला जाणार आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष विठ्ठल गुरव,  तालुका उपाध्यक्ष रेवणसिद्ध सुतार,  सरचटणीस शिवानंद कोळी,  दीपक कांबळे,  प्रवीण गुंजले,  प्रविणकुमार बाबर,  सुनील मुलगे,  काशीनाथ माने,  रजाक जमादार,  हसन मुजावर,  सोमनाथ आलूरे,  बसवराज गायकवाड,  सुचिता काळे,  संगमनाथ कुंभार,  सूर्यकांत रामपुरे,  नजीर शेखजी,  अवधूत पुजारी,  शिवशरण कोळी,  हनुमंत सानप यांच्यासह सर्व कोतवाल बांधव उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!