---Advertisement---

माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे पाठोपाठ मंदाताई खडसे यांनाही ईडीने बजावली चौकशीसाठी नोटीस

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : पुणे येथील वादग्रस्त भूखंड खरेदी प्रकरणी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले आहे. यामुळे माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

पुण्यामधील भोसरी येथील वादग्रस्त भूखंड प्रकरणाची किडीने चौकशी सुरू केली असून यात माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली आहे. तर काल माजी मंत्री खडसे यांची तब्बल नऊ तास चौकशी करण्यात आली.

भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात मंदाकिनी खडसे यांचा देखील समावेश असल्याची माहिती ईडीला मिळाली होती. त्यानंतर त्यांना समन्स बजावण्यात आलं होतं. याआधी, भोसरी भूखंड प्रकरणात एकनाथ खडसे यांची जानेवारी महिन्यात ईडीने चौकशी केली होती. याच प्रकरणात माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना देखील ईडीने चौकशीसाठी समन्स बजावला आहे.

मंदाकिनी खडसे आणि गिरीश चौधरी यांनी संयुक्तरीत्या भोसरी येथील भूखंड खरेदी केला होता. गिरिष चौधरी यांना अटक केल्यानंतर खडसे दाम्पत्यावर कारवाईची टांगती तलवार असल्याचे आदेश मानले जात होते. यावर मंदाकिनी खडसे यांनी मुदत मागून घेतली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!