---Advertisement---

नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमधून पाच लाखांच्या नोटां गायब

Follow Us:
---Advertisement---

नाशिक : येथील करन्सी नोट प्रेसमधून पाच लाखांच्या नोटा चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाचशे रुपयांचे दहा बंडल गायब झाली असल्याची माहिती पुढे येत असून या प्रकरणी मात्र, याबाबत अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.

नाशिक येथील करन्सी नोट प्रेसमध्ये कडेकोट सुरक्षा बंदोबस असतो. असे असताना देखील पाचशे रुपयांचे दहा बंडल गेले कुठे? यामुळे करन्सी नोट प्रेसमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे.

नाशिकरोड येथील करन्सी नोट प्रेसमध्ये 2000 आणि 500 रुपयांच्या नोटांची छपाई होते. याच प्रेसमधून पाच लाखांच्या नोटा चोरीला गेल्याची दोन आठवड्यापूर्वी घटना घडली आहे. चोरी होऊन दोन आठवडे होऊन सुद्धा अद्याप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल न झाल्याने करन्सी प्रेसमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!