---Advertisement---

महाराष्ट्र राज्य विक्रीकर न्यायाधिकरणाच्या अध्यक्षपदी सुहास माने, अक्कलकोटच्या शिरपेचात मानाचा तुरा

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : महाराष्ट्र राज्य विक्रीकर न्यायाधिकरणाच्या अध्यक्षपदी सुहास व्यंकटराव माने यांची नियुक्ती राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे.

सुहास व्यंकटराव माने हे सेवानिवृत्त प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश होते. न्यायदान क्षेत्रातील त्यांचा अनुभव कर्तव्यकठोर न्यायाधीश म्हणून त्यांचा लौकिक आहे.ते मुळचे अक्कलकोट येथील आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली सदरची नियुक्ती राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी केली.

या प्राधिकरणावर श्रीराम देशमुख,अहमद सय्यद, राजेंद्रकुमार वैष्णव,उमर सिद्दीकी,विवेक विद्वांस, चंद्रकांत गड्डम हे सदस्य आहेत. अक्कलकोटला राज्यस्तरीय प्राधिकरण अध्यक्ष पदाचा बहूमान मिळाल्याने सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!