---Advertisement---

राज्यपालांच्या हस्ते मातृभूमी भूषण पुरस्कार प्रदान

Follow Us:
---Advertisement---

मुंबई, दि. 18 : माता, मातृभाषा व मातृभूमी यांप्रति प्रेम बाळगून प्रत्येकाने समर्पित भावनेने कार्य केल्यास भारताला जगातील सर्वात सुंदर देश बनवता येईल असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

हिंदी अकादमी, मुंबई या संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमात राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते भारतीय सैन्यदलातील सेवानिवृत्त अधिकारी व जवान यांना मातृभूमी भूषण सन्मान 2021 प्रदान करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना शिक्षण भूषण, साहित्य भूषण, समाज भूषण व सेवा भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाला माजी गृह राज्यमंत्री कृपाशंकर सिंह, हिंदी अकादमीचे अध्यक्ष डॉ. प्रमोद पाण्डेय व उपाध्यक्ष डॉ. आलोक चौबे उपस्थित होते.

अलीकडच्या काळात देशात तौक्ते वादळ, भूस्खलन, अतिवृष्टी व कोरोनासारखी संकटे आली. या सर्व संकटप्रसंगी नागरिकांनी तसेच डॉक्टर्स, पोलीस, स्वच्छता कर्मचारी, शेतकरी यांनी परस्परांना सहकार्य केल्यामुळे या संकटांना देश धैर्याने सामोरा गेला, असे राज्यपालांनी सांगितले.

राज्यपालांच्या हस्ते यावेळी आर्मी डेंटल कोरच्या वीर नारी डॉ. कांता मुखर्जी, हुतात्मा ले. कमांडर फिरदौस मोगल यांच्या पत्नी वीर नारी श्रीमती कर्झीन मोगल, ग्रुप कॅप्टन त्रिलोकी भटारा, सुभेदार विनायक उपाध्ये, मास्टर चीफ एम. प्रसाद, मेजर प्रांजल जाधव, कॅप्टन के. पी. हरिदासन, कमांडर विजय वधेरा,  सार्जंट दत्तात्रय अर्जुन उतेकर, कमोडोर बी. बी. मिस्त्री यांना मातृभूमी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

रॅन इंटरनॅशनल समूहाच्या प्रमुख डॉ. ग्रेस पिंटो, मायाशंकर चौबे, पियुष शुक्ला, सौरभ पांडे यांना शिक्षण भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

युगाराज जैन यांना साहित्य भूषण तर राजाभाऊ सेठ, डॉ मुकेश गौतम, प्रशांत फुलवणे, प्रविण राय व कमलेश नाहर यांना समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

डॉ. प्रकाश जाधव, डॉ बालनाथ चकोर, डॉ आनंद पांडे, वेदिका चौबे व उमेश पांडे यांना  सेवा भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!