---Advertisement---

पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहाचे आयोजन

Follow Us:
---Advertisement---

 

सोलापूर (प्रतिनिधी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस  आ. सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सेवा सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त उत्तर तालुक्यातील गावात विविध  उपक्रमाचे उद्घाटन आ. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
पाथरी येथे वृक्षारोपण कार्यक्रम व जेष्ठ नागरिकांना आधार काठीचे वाटप करण्यात आले.  यावेळी आ. देशमुख यांनी पाथरी आणि पाकणी गावातील नागरिकांशी संवाद साधला व गावच्या विकासावर चर्चा केली. यावेळी तालुकाध्यक्ष काशिनाथ कदम, श्रीमंत बंडगर, संभाजी गणेशकर, विष्णू बंडगर, विशाल जाधव, पिंटू मळगे, सरपंच लक्ष्मी मळगे,  सुनील गुंड आदी उपस्थित होते. हिरज येथील स्मशानभूमीचे वॉल कम्पाउंडचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर दक्षिण पूर्व मंडल अध्यक्ष शिवशरण बब्बे यांच्या निलम नगर येथील निवासस्थानी भेट देऊन गणेशाची पूजा केली. त्यानंतर बूथ प्रमुखांसोबत बैठक घेतली. यावेळी आ. देशमुख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तळागाळातील लोकांसाठी राबवलेल्या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहचवावी, असे आवाहन केले.  यावेळी  सरपंच इलाही शेख, उपसरपंच गीता लिंबोळे, पूर्वा वाघमारे, राजू सदगार, विशाल जाधव, नंदू पवार,नंदकिशोर पाटील, शशी थोरात, श्रीनिवास पुरुड, व्यंकटेश कोंडी, तुकाराम काळे, अर्चना वडणाल, बसवराज केंगनाळकर व कार्यकर्ते  उपस्थित होते. त्यानंतर देशमुख यांनी बेलाटी गावातील नागरिकांशी संपर्क साधून तेथील समस्या जाणून घेतल्या. यावेळी निर्मला कुंभार आणि प्रभू राठोड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!