---Advertisement---

“यांच्या” आशीर्वादामुळेच ड्रगचा खेळ सुरू, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा मोठा आरोप

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा फोटो शेअर केला असून त्यांच्यासोबत जयदीप चंदूलाल राणा असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ‘या’ ड्रग्स पेडलरचं भाजपसोबत कनेक्शन काय? असा सवाल केला आहे.

त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मलिक यांनी अमृता यांच्यासोबतची फोटोमधील व्यक्ती ही जयदीप राणा असल्याचे सांगतीले. तसेच जयदीप राणा हा ड्रग्ज ट्राफिकिंगमध्ये सध्या तुरुंगात असून या ड्रग्ज माफियासोबत फडणवीसांचे संबंध असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांची पत्नी अमृता यांनी नदी संवर्धनासाठीचे गाणे गायले होते. त्या गाण्यावर तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमृता यांनी अभिनय केला होता. त्यासोबतच तत्कालिन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही अभिनय केला होता, त्याचा उल्लेख करुन मलिक म्हणाले, त्या गाण्याचा फायनान्सर हा जयदीप राणा होता.

जयदीप राणासोबत अमृता यांचे फोटो आहेत. हे फोटो सार्वजिनक कार्यक्रमात लोक भेटतात असा फोटो नाही. तर ते एकमेकांना ओळखत असल्याच्या दावा मलिक यांनी केला. फडणवीस यांच्याच काळात एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची बदली झाल्याचेही मलिक म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!