---Advertisement---

मलिकांनी केलेले सर्व आरोप हास्यास्पद, दिवाळी नंतर बॉंम्ब मी, फोडणार – देवेंद्र फडणवीस

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : विरोधीपक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर मुंबईत ड्रग्जचा खेळ सुरु होता, असा गंभीर आरोप राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेवुन केला होता. त्या सर्व आरोपांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेवुन प्रत्युत्तर दिले आहेत. नवाब मलिक यांचे सर्व आरोप फडणवीस यांनी फेटाळून लावले आहेत. नवाब मलिकांचे आरोप म्हणजे लवंगी फटाका असल्याची टिका विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणविस यांनी यावेळी केला.

नवाब मलिक यांनी केलेले सर्व आरोप हास्यास्पद आहेत. त्यांनी जाणीवपूर्वक माझ्या पत्नीचा आणि माझा फोटो ट्विटरवर शेअर केला. चार वर्षापूर्वीचा फोटो उकरुन काढणाऱ्या मलिकांची मानसिकता समजली, असे सांगत नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी असलेल्या संबंधांचे पुरावे राष्ट्रवादीकॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देणार असल्याचा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिला. सुरुवात त्यांनी केला त्याचा शेवट मी करणार आह असेही फडणविस म्हणाले.

नवाब मलिकांच्या डोक्यावर परिणाम झालाय – प्रवीण दरेकर
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या आरोपावर विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नवाब मलिकांच्या डोक्यावर परिणाम झालेला दिसतोय. वैयक्तिक पातळीवर फडणवीस यांच्या कुटुंबियांवर किळसवाण्या आरोपांच्या हरकती सुरु आहे. देशाच्या, महाराष्ट्राच्या इतिहासात कोणताही मंत्री असा वागलेला नाही. मलिक यांचे वागणे पाहिले तर त्यांनी सर्व गोष्टींचे उल्लंघन केले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला शोभेल असे त्यांचे वागणे नाही. त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!