---Advertisement---

विधानपरिषदेच्या ६ जागांसाठी निवडणूक जाहीर, १० डिसेंबर रोजी मतदान १४ डिसेंबरला मतमोजणी

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : राज्यातील पाच मतदारसंघातील विधानपरिषदेच्या ६ जागांवर राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली आहे. त्यानुसार ६ जागांसाठी १० डिसेंबरला मतदान होणार आहे. तर या जागांचा निकाल १४ डिसेंबरला जाहीर होणार आहे. विधानपरिषद सदस्यांची मुदत संपत आली असल्यामुळे या निवडणुका घेण्यात येत आहे. ६ जागांवरील सर्व सदस्यांची विधानपरिषदेवरील मुदत ही १ जानेवारी २०२२ रोजी संपणार आहे. एकूण ८ विधानपरिषद आमदारांचा कार्यकाळ संपत आला आहे.

विधानपरिषदेची मुदत डिसेंबरमध्ये संपणाऱ्या नेत्यांमध्ये मुंबईतून शिवसेना नेते रामदास कदम, काँग्रेसचे भाई जगताप, काँग्रेसचे नेते सतेज पाटील, भाजपचे अमरिश पटेल, शिवसेनेचे गोपी किशन बाजोरिया, गिरीश व्यास, भाजपचे प्रशांत परिचारक, अरुण जगताप या नेत्यांचा समावेश आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!